You are currently viewing आटपाडी येथे भाजप बूथ प्रमुखांची आढावा बैठक उत्साहात संपन्न!

आटपाडी येथे भाजप बूथ प्रमुखांची आढावा बैठक उत्साहात संपन्न!

आटपाडी / (प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार) :

आटपाडी येथे भारतीय जनता पक्षाच्या बूथ प्रमुखांची आढावा बैठक माजी समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.

यावेळी पक्षसंघटना अधिक मजबूत करण्यासोबतच पक्षांतर्गत कामकाज करताना येणाऱ्या विविध अडीअडचणी, स्थानिक प्रश्न तसेच आगामी काळातील संघटनात्मक कार्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

बूथ पातळीवरील संघटन अधिक सक्षम करणे, प्रत्येक कार्यकर्त्याशी समन्वय साधणे आणि पक्षाचे विचार व विकासकामे प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविणे याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी प्रदेश कार्यालयातून आलेले कमलेश झोडगे साहेब, किशोर बिराजदार साहेब, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अक्षयराज माने, जिल्हा सरचिटणीस विलास काळेबाग, नगराध्यक्ष यू. टी. जाधव सर, तालुकाध्यक्ष दादासाहेब हुबाले, पंचायत समिती सदस्य जयवंत सरगर, भाजप नेते बंडूशेठ कातूरे, पंचायत समिती सदस्य दादासाहेब मोटे सर, मनोजकुमार पाटील, नगरसेवक ऋषिकेश देशमुख, नगरसेवक जयंत पाटील, उमाजी चव्हाण, भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अनिल सूर्यवंशी तसेच सर्व बूथ प्रमुख उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा