You are currently viewing नॅशनल अल्पागुत चॅम्पियनशीप कराटे स्पर्धेत तुषार तेंडोलकरला सुवर्ण पदक

नॅशनल अल्पागुत चॅम्पियनशीप कराटे स्पर्धेत तुषार तेंडोलकरला सुवर्ण पदक

*नॅशनल अल्पागुत चॅम्पियनशीप कराटे स्पर्धेत तुषार तेंडोलकरला सुवर्ण पदक*

*ठाणे जिल्ह्यातील काल्हेर, भिवंडी येथे पार पडली स्पर्धा*

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील झाराप गावचा सुपुत्र, सद्ध्या ठाणे जिल्ह्यातील भायंदर येथे राहणारा इंटरनॅशनल शोतोकॉन कराटे असोसिएशन जपानच्या तुषार तेंडोलकरने ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, काल्हेर येथे पार पडलेल्या “राष्ट्रीय अल्पागुत चॅम्पियनशिप २०२२” स्पर्धेत *स्पायरींग*(फाईट) मध्ये सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. कराटे असोसिएशनचे प्रेसिडेंट(भारत) हसन इस्माईल सरांनी राष्ट्रीय अल्पागुत चॅम्पियनशिप २०२२ ही स्पर्धा भरवली होती. अल्पागुतचे (Azerbaijaan Country) फाउंडर कुस्तान वासिफ नमाझोव सरांच्या हस्ते तुषार तेंडोलकरला सुवर्ण पदक देऊन गौरविण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री कपिल पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर व्यासपीठावर चैतन्य सावंत सर देखील हजर होते.


तुषार हा कुडाळ तालुक्यातील झाराप गावचा मूळ रहिवासी असून सद्ध्या भायंदर ठाणे येथे नोकरी निमित्त राहत आहे. असोसिएशन ऑफ ट्रेडिशनल शोटोकॉन कराटे दो (इंडिया)(ATSK) चा टेक्निकल डायरेक्टर म्हणून तुषार काम पाहत आहे. तुषार तेंडोलकरला मिळालेल्या यशामुळे झाराप गावच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. तुषारच्या यशामुळे सर्वच स्तरावरून त्याचे अभिनंदन केले जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा