You are currently viewing बांदा ग्रामपंचायतीसाठी ७१ टक्के मतदारांनी बजावला हक्क

बांदा ग्रामपंचायतीसाठी ७१ टक्के मतदारांनी बजावला हक्क

मशीन बंद पडल्याने समस्या: मतदान प्रक्रिया सुरळीत पडली पार…

बांदा:

संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष असलेल्या बांदा शहर ग्रामपंचायतच्या सरपंच पदासह १४ जागांसाठी आज पार पडलेल्या निवडणुकीत ५ हजार २७१ पैकी ३ हजार ७५३ मतदारांनी (७१.२० टक्के) मतदानाचा हक्क बजावीला. शहरातील प्रभाग क्रमांक ३ मधील निमजगा मतदान केंद्रावर दोन वेळा मशीन बंद पडल्याने सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती. कोणताही अनुचित प्रकार न घडता मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली.

अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अधिकारी बगाटे, सावंतवाडीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.रोहिणी सोळं यांनी बांदा येथे आपली भेट दिली. बांदा पोलीस निरीक्षक शाम कारावळे, उपनिरीक्षक समीक्षक भोसले पोलीस कर्मचारी बंदोबस्त तपासासाठी होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा