*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी सुभाष उमरकर ,सामनगांव नाशिक लिखित अप्रतिम काव्यरचना*
*शोध*
नेहमी वाटे शिरावरती,टांगती तलवार आहे ..
किती जाहले तुकडे ,मन बेजार आहे …..!!
किती झेलतो वार, जखमांची गिनती कशाला ….
मन झाले पाषाण ,धारधार अवजार आहे …!!
हिमालय साठवला कोणी ,मनाच्या गाभाऱ्यात..
गोठले काळीज प्रश्नांनी , मोठा आजार आहे ….!!
तू आहेस सोबतीला, बळ हत्तींचे मिळते ….
सामना संकटाशी पराभव मानण्यात नकार आहे ..!!
स्वप्न उद्याचे पाहीले,बीज आशेचे पेरले ,
जरी लहरी निसर्ग ,रोपटे फुलणार आहे ….!!
कोण चालतो न पडता,वाट खडतर असता
सोबत चाललो हात घेऊन, ध्येय न दुर आहे …..!!
थांबायाचे आहे कुठे तरी विसावा निश्चित असतो ..
सोबत मिळो न मिळो ,सुख अपार आहे …!!
✒️✒️
*सुभाष उमरकर ,सामनगांव नाशिक.*