You are currently viewing गुरुपौर्णिमा

गुरुपौर्णिमा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी गीतकार संगीतकार गायक अरुण गांगल यांची अप्रतिम काव्यरचना*

गुरुपौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा!

*” गुरुपौर्णिमा”*

धन्य आज शुभ सुदिन गुरुपौर्णिमा
वंदू तव चरणा गाऊ थोर महिमा।।धृ।।

सर्व काही घडते सद्गुरू कृपेनं
ते जे देतील ते स्वीकारावं समजुन
गुरू काळजी घेतील सर्व भक्त प्रेमा।।1।।

नामात प्रेम राहो श्रीगुरूंचे सांगणं
नाम जपावे होई शुद्ध अंतःकरण
अनुसंधान रहावे जिव्हा लागो नामा।।2।।

गुरू शिष्यांचे अमोल शब्दातीत नाते
जपावे हृदयांतरी मर्मबंधाते
परंपरा युगयुगांची राहे गरिमा।।3।।

काव्य:श्री अरुण गांगल.कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.
Cell.9373811677.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve − 11 =