You are currently viewing खेळ शब्दांचा…

खेळ शब्दांचा…

खेळ शब्दांचा…

किती सोपं असतं,
एखाद्याच्या मनातलं ओळखणं..
शब्दांचीही गरज नसते तिथे..
मनाने तेवढं मनाशी,
एकरूप व्हावं लागतं…
चेहरे एकमेकांशी हसतात,
हास्याच्या मागील भावना,
ओठांच्या आड दडवून,,,
समोरच्याला कळू ही न देता…

शब्दांचं मात्र तसं नसतं,
ते थोडे जड होतातच,,,
जेव्हा बाहेर पडतात तेव्हा,
ओठ थरथर कापतात….
त्यांना फुटायचं असतं
ते अंतःकरणातून….
जिथून फक्त नी फक्त,,,
सत्यच बाहेर पडतं…
अगदी कडवट असलं तरीही…

शब्द…
सरळ बोलून जातात,
मनात साचलेलं सगळं सांडून,
खुशाल रिते होतात,,,
अगदी गरळ ही ओकतात…
हृदयातली खोल गाडलेली,,
उफाळून वर येऊ पाहणारी,,
तीव्र वेदनाही देतात,,,
रक्ताचा एक थेंबही न वाहता…

दुःख….. एका क्षणात,
स्वतःपासून….
परकी करून टाकतात,
अन,,,,,
पुन्हा एकदा …
मनाला कुंपण घालतात,
” प्रवेश निषिद्ध ”
असाच जणू फलक लावून…

शब्द हे असेच असतात…
कधी उडते…
कधी थरथरते,,,
कधी तीक्ष्ण,,,
तर कधी अबोल….!!!

(दिपी)🖋
दीपक पटेकर

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen − thirteen =