You are currently viewing सावंतवाडी एस टी डेपो आगारातील विविध समस्याप्रश्नी मनसे पुन्हा आक्रमक

सावंतवाडी एस टी डेपो आगारातील विविध समस्याप्रश्नी मनसे पुन्हा आक्रमक

सावंतवाडी आगारप्रमुख नरेंद्र बोधे यांना विचारला जाब

सावंतवाडी

सावंतवाडी एस टी डेपो आगारातील स्वछतागृह तसेच विविध समस्याप्रश्ननी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी यांनी पुन्हा धडक देत आगारप्रमुख नरेंद्र बोधे यांना जाब विचारला. यावेळी मनसेने आक्रमक भूमिका घेताच सावंतवाडी एस टी बस स्थानकातील सार्वजनिक शौचालयाची तातडीने स्वछता करण्यात आली. बस स्थानकातील प्रलबीत प्रश्न तसेच गाड्या वेळेत सूटत नसल्याच्या प्रवाशाच्या तक्रारीबाबत देखील सावंतवाडी आगारप्रमुख यांच्याशी चर्चा केली.

सावंतवाडी एस टी बस स्थानक परिसरात अस्वछता पसरली आहे. स्थानक परिसरात असलेला रस्ता पूर्णतः उखडून गेला असून प्रवाशी तसेच बस स्थानकातील कर्मचारी यांना धुळीचा त्रास सहन करावा लागतो, आगारातील असलेल्या सार्वजनिक महिला वं पुरुष शौचालयामध्ये अस्वछता असून दुर्गधि पसरली आहे याचा प्रवाश्याना त्रास होत असल्याची माहिती मिळताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आगारात धडक देत या समस्येची पाहणी केली होती. यावेळी कंट्रोलर बस आगाराचे अधिकारी यांच्या ही निदर्शनास ही बाब आणून देत स्वछतागृहची साफसफाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. यावेळी तिथे असलेल्या ठेकेदारास ही धारेवर धरले होते. सध्या बसस्थानकतील महिलां स्वछतागृहात महिलां कर्मचारी नाही तर शौचालयामध्ये ठेकेदाराकडून पैसे आकारून देखील म्हणावी तशी स्वछता केली जातं नाही त्यामुळे संबंधित ठेकेदार याच्यावर कारवाई करण्याची मागणी देखील मनसे पदाधिकारी यांनी करीत या समस्या मार्गी न लागल्यास मनसे पदाधिकारी यांच्या रोषला सामोरे जावे लागणार असल्याचे सांगितले होते. त्यावर प्रभारी आगारव्यवस्थापक मोहिते यांनी मंगळवार पर्यत ही कामे पूर्ण करून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार शनिवारी मनसे पदाधिकारी यांनी पुन्हा एस टी बस स्थानकात धडक दिली.

यावेळी शौचालये तसेच स्वछतागृह यामध्ये दुर्गधी वं साफसफाई न आढळल्याने पदाधिकारी आक्रमक झाले त्यांनी आगारव्यवस्थापक बोधे यांना धारेवर धरले यावेळी कंत्राटदार याच्या कामगारांकडून तातडीने साफसफाई करून घेण्यात आली. महिला स्वछतागृहात महिला कर्मचारी नेमण्याबाबत कंत्राटदार याला सूचना देण्यात आल्याचे बोधे यांनी सांगितले. दरम्यान आगारातील स्वछता तसेच गाड्या नियमित वेळेवर सुटत नसल्याबाबत देखील पदाधिकारी यांनी बोधे यांच्याशी चर्चा केली. त्याचे नियोजन सुरु असून प्रवाशयांच्या मागणीनुसार गाड्या वेळेत सोडण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी माजी शहराध्यक्ष तथा विद्यार्थीसेनेचे जिल्हाअध्यक्ष आशिष सुभेदार परिवहन सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू कासकर मंदार नाईक शुभम सावंत कौस्तुभ नाईक मनोज कांबळी भाऊ गावडे ओमकार गावडे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा