You are currently viewing अमृत महोत्सवाचे औचित्य साधून रुग्णांसाठी बेडशीटांचं वाटप

अमृत महोत्सवाचे औचित्य साधून रुग्णांसाठी बेडशीटांचं वाटप

अमृत महोत्सवाचे औचित्य साधून रुग्णांसाठी बेडशीटांचं वाटप

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान व ज्येष्ठ नागरिक केशवसुत कट्टा यांच्या संयुक्त उपक्रम

सावंतवाडी

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान व ज्येष्ठ नागरिक केशवसुत कट्टा यांच्या संयुक्त विद्यमानाने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय व राणी जानकीबाई साहेब सुतिका गृह या रुग्ण सेवा केंद्रामध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त 75 व्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून रुग्णांसाठी 120 बेडशीटांचं वाटप करण्यात आले. रुग्णांना याचा लाभ व्हावा याकरिता हा उपक्रम राबवण्यात आला. याप्रसंगी अधीक्षक डॉ ज्ञानेश्वर एवाळे,डॉ चौगुले,डॉ जाधव, सिस्टर व हॉस्पिटल कर्मचारी उपस्थित होते तर राणी जानकीबाई साहेब सुतिकागृहाचे अधीक्षक डॉ. विकास कटाने डॉ. संजय दळवी ,वरिष्ठ लिपिक भार्गवराम शिरोडकर तसेच सिस्टर व कर्मचारी उपस्थित होते. जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर सामाजिक बांधिलकी विषयी बोलताना म्हणाले सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून लोकहित जपणारे असे अनेक उपक्रम शहरात व शहराच्या बाहेर राबवले जातात सामाजिक बांधिलकीचे कार्य कौतुकास्पद आहेत ही संघटना विविध क्षेत्रांमध्ये प्रामाणिक व निस्वार्थपणे काम करते या संघटनेचे वैशिष्ट्य म्हणजे या संघटनेमध्ये विविध धर्माचे लोक एकत्र येऊन ही संघटना बांधली आहे आणि सेवाभावी काम सुरू केली. अनाथ, निराधार, गरजू रुग्ण व आपत्कालीन परिस्थितीमध्ये सेवा देण्यासाठी ही संघटना नेहमी अग्रेसर असते. यापूर्वी या संघटनेच्या माध्यमातून हॉस्पिटलला टेबल, खुर्च्या, व्हीलचेअर, स्ट्रेचर, कर्टन व रुग्ण रुग्णुपयोगी विविध वस्तू पुरवण्यात आल्या होत्या.
हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ. एवाळे यांनी सामाजिक बांधिलकीचे तोंड भरून कौतुक केले. सामाजिक बांधिलकीचे असेच सहकार्य पुढे राहू दे आम्ही आमच्या परीने रुग्णांना चांगल्या प्रकारे सेवा देण्याच काम आम्ही करू. सामाजिक बांधिलकीचे उपाध्यक्ष प्रा. शैलेश नाईक यांनी सर्वांच्या आभार मानले. याप्रसंगी सामाजिक बांधिलकीचे अध्यक्ष प्रा.सतीश बागवे, शैलेश नाईक ,समीरा खलील, संजय पेडणेकर रवी जाधव ,अशोक पेडणेकर, हेलन निबरे रूपा मुद्राळे, सुजय सावंत, शरद पेडणेकर, श्याम हळदणकर, शेखर सुभेदार तर जेष्ठ नागरिक केशवसुत कट्टा यांच्या वतीने दत्तप्रसाद गोठस्कर व रोड्रिक्स हे उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा