सावंतवाडी
अवजड वाहतूक करणाऱ्या कंटेनरच्या पुढील चाकांची अचानक एक्सेल तुटल्यामुळे होणारा अपघात चालकाच्या प्रसंगावधानामुळे टळला. संबंधित चालकाने गाडी जागच्या जागीच थांबविल्याने कोणतीही हानी झाली नाही. यावेळी मळगाव रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या मार्गावरील वळणावर कंटेनरच्या पुढील चाकांची एक्सेल अचानक तुटली. मात्र चालकाने प्रसंगावधान दाखवत गाडी जागीच थांबवल्याने पुढील दुर्घटना टळली. या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र काल पहाटेपासून आज सकाळपर्यंत संबंधित कंटेनरची दुरुस्ती न झाल्याने “तो” मुख्य रस्त्यावरील वळणावर तसाच उभा होता. त्यामुळे त्याचा परिणाम वाहतुकीवर सुद्धा झाला.