You are currently viewing परुळे येथे ९ जानेवारीला सवेश नाट्यगीत गायन स्पर्धेचे आयोजन…

परुळे येथे ९ जानेवारीला सवेश नाट्यगीत गायन स्पर्धेचे आयोजन…

वेंगुर्ले

परुळे येथील युवक कला-क्रीडा मंडळाच्या वतीने राधारंग फाउंडेशन पुरस्कृत सवेश नाट्यगीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा ९ जानेवारीला रात्री ८:०० वाजता श्री देव आदिनारायण मंदिराच्या रंगमंचावर होणार आहे. या स्पर्धेत १५ वर्षांवरील सर्व स्त्री-पुरुष सहभागी होऊ शकतात.
स्पर्धेतील प्रथम चार विजेत्यांना अनुक्रमे रु.२५००,२०००,१५०० आणि १०००/- तसेच सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या नावनोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी डाॕ.प्रशांत सामंत ९४२३३१८२३१ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा