मुंबई –
बार कॉन्सील ऑफ इंडीयाच्या परिक्षेचे वेळापत्रक जाहीर झालेले आहे, बार कोन्सिल ऑफ इंडीया मनमानी करून व डोके गहाण ठेवून संपूर्ण परिक्षेचा कार्यक्रम राबवत असून महाराष्ट्र राज्य बार कोन्सिल चे पदाधिकारी त्यांचे नोकर असल्या प्रमाणे वागत आहेत. विद्यार्थ्याच्या सोयीसुविधीचा कोणताही विचार हया परिक्षेसाठी केला गेला नसल्याचा आरोप महाराष्ट्र काँग्रेस प्रवक्ते अँड धनंजय जुन्नरकर यांनी केलेला आहे. 3 विद्यार्थ्याना परिक्षा फी च्या नावाखाली लूट केली जात आहे : विशेष प्रवर्गासाठी 2500 तर सर्वसाधारण वर्गा साठी 3250 रुपये इतकी की प्रत्येक विद्यार्थ्यांच्या कडून घेतली जाणार आहे.
परिक्षेची 50 केंद्रे असून एका केंद्रापासून दुसरे केंद्र 500 ते 1000 कि.मी. लांब आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांला 3 केंद्रांची नावे लिहीणे अनीवार्य आहे. मुंबईच्या विद्यार्थ्याला मुंबई मिळेल त्याची कोणतीही खात्री नाही .
त्याला पुणे, औरंगाबाद, नांदेड कुठेही जावे लागेल – हा तद्दन मुर्खपणा आहे, असे अँड. धनंजय गुन्नूरकर म्हणाले. विद्यार्थ्यांचा जायचा यायचा वेळ, खर्च, राहोणे, खाणे-पिणे ह्यात 7 ते 8 हजार रूपये खर्च येणार आहे.
शिवाय परिक्षा फी 3250 भरायची. एवढे पैसे भरून विद्यार्थ्यांना काहीही मिळणार नाही.
महाराष्ट्र बार कोन्सिलने विद्यार्थ्यांचा निकाल लागल्यावर सनद दयायच्या नावाने 15000 रु. व सदस्यता म्हणून 150 . आधीच विदयार्थ्यांच्या खिशावर डल्ला मारून घेतलेले आहेत. मराठी विद्यार्थ्यांना कायद्याची चांगली पुस्तके उपलब्ध व्हावीत म्हणून कोणतीही योजना अथवा प्रयत्न महाराष्ट्र बार कोन्सिल चा दिसत नाही.
परिक्षवाढी ह्याआधी बेअर ऍक्ट घेऊन जायची परवानगी होती. ते बेअर ऍक्ट केवळ इंग्रजी मिळत. ते बेअर ऍक्टनोटस शिवाय असलेले हवे असे नोटीफिकेशन काढल्याने ते विकत घ्यायला विदयार्थ्यांना 2000 में 22000 रु. अजून खर्च येत आहे…
30 में 40 टक्के विद्यार्थी, मराठी माध्यमातून परिक्षा देतात. त्यांच्यासाठी कोणतीही पुस्तकांची व्यवस्था नाही. त्यांनाही इथून तिथून भाषांतर करून किंवा इंग्रजी पुस्तके विकत घ्यावी लागत आहेत. महाराष्ट्र बार कोन्सिलचा या मराठी
विदयार्थ्यासाठी शून्य उपयोग असून मराठी विद्यार्थ्यांसाठी कोणताही आवाज महाराष्ट्र बार कोन्सिल उचलत नसल्याने सर्व कार्यकारीणीची हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी अंड. धनंजय जुन्नरकर यांनी केलेली आहे. 40 वर्षे प्रक्टीस करणाया वकीलांना सर्व कलमे पाठ नसतात तर काल पास झालेल्या विदयार्थ्यांना – बिना, पुस्तक परिक्षा दयायला लावायची योजना बार कोन्सिल ऑफ इंडीया करू कशी काय करत आहे असा संतप्त सवाल विद्यार्थी विचारत असल्याचे समजते.
विद्यार्थी ज्या जिल्हयात राहात आहे तिथेचं – त्याची परिक्षम व्हावी व मराठी भाषेत पेपर लिहीणाऱ्या
विद्यार्थ्याचा बेअर ऍक्ट पुस्तकांबाबत सहानुभूतीने विचार केला जावा अशी मागणी, महाराष्ट्र काँग्रेस प्रवक् अँड. धनंजय जुकरकर यांनी केली आहे.