You are currently viewing कणकवली नगरपंचायतची विक्रेत्यांवर धडक कारवाई

कणकवली नगरपंचायतची विक्रेत्यांवर धडक कारवाई

कणकवली :

कणकवली नगरपंचायतच्या वतीने मंगळवारी आठवडा बाजाराच्या निमित्त बाजारपेठेत रस्त्यावर दुकाने लावलेल्या विक्रेत्यांवर ७५ मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या वापरल्या प्रकरणी कारवाई करण्यात आली. नगरपंचायत पथकाने १० विक्रेत्यांवर प्रत्येकी २०० रुपये प्रमाणे २ हजार रुपयांची तर शहरातील बाजारपेठेतील एक हॉटेल मालक व अन्य एका दुकानदारावर प्रत्येकी ५०० रुपये प्रमाणे १ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.

नगरपंचायतीच्या पथकाने अचानक केलेल्या या कारवाईमुळे अनेक व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले. कणकवली नगरपंचायत च्या वतीने गेले काही काळ ही कारवाई थांबविण्यात आली होती. कोरोना मुळे सर्वच व्यापारी आर्थिक अडचणीत असल्यामुळे या कारवाईकडे दुर्लक्ष करण्यात आले. मात्र गेले काही दिवस फळ विक्रेते, भाजी व किरकोळ विक्रेते व दुकानदारांकडून सरसकट प्लास्टिक पिशव्यांचा वापर केला जात होता. त्यामुळे प्रदूषणात वाढ होत असतानाच शासनाने दिलेल्या नियमांचा भंग होत होता. त्यामुळे कणकवली नगरपंचायत पथकाने आज ही धडक कारवाई मोहीम राबवली.

त्यात सुमारे २० किलो हुन जास्त प्लॅस्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या. कणकवली नगरपंचायत चे स्वछता निरीक्षक विनोद सावंत, प्रवीण गायकवाड, सतीश कांबळे, प्रितेश खैरे, प्रकाश राठोड आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा