You are currently viewing सकल मराठा समाजाकडून विजय वडेट्टीवार यांचा निषेध…

सकल मराठा समाजाकडून विजय वडेट्टीवार यांचा निषेध…

सुहास सावंतांचा इशारा ; उद्याच्या दौऱ्यात निदर्शने करण्याचे मराठा बांधवांना आवाहन…

कुडाळ

मराठा आरक्षणाचा घटनाबाह्य विरोध करणाऱ्या पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचा सकल मराठा समाजाकडून निषेध व त्यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यात निदर्शने करण्याचा इशारा सकल मराठा समाज नेते सुहास सावंत यांनी दिला आहे. श्री वडेट्टीवार हे उद्या २१ तारखेला सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहे. यावेळी मराठा बांधवांनी त्यांच्या भेटीला जाऊ नये, त्यांना सहकार्य करू नये, उलट निदर्शने करावीत,असे त्यांनी आवाहन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 − 13 =