You are currently viewing मतदान व मतमोजणी दिवशी आठवडे बाजार बंद ठेवण्यात येणार

मतदान व मतमोजणी दिवशी आठवडे बाजार बंद ठेवण्यात येणार

– अपर जिल्हाधिकारी डॉ.जयकृष्ण फड

सिंधुदुर्गनगरी

जिल्हयातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2022 करीता रविवार दिनांक 18 डिसेंबर 2022 रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी व दिनांक 20 डिसेंबर 2022 रोजी होणाऱ्या मतमोजणीच्या दिवशी सिंधुदुर्ग जिल्हयातील खाली नमुद केलेले  आठवडा बाजार बंद  ठेवण्याबाबतचे आदेश निर्गमित करणेत येत आहेत. तसेच सदर दिवशी भरविण्यात येणारे आठवडा बाजार वरील दिवस बदलून अन्य दिवशी भरविण्यास अनुमती देण्यात येत आहे.

            दिनांक 18 डिसेंबर 2022 रोजी मतदान दिवशी आठवडे बाजार बंद ठेवण्‍यात येणाऱ्या तालुकानिहाय गावांची नावे पुढीलप्रमाणे मालवण- चौके, कणकवली – नांदगाव,कनेडी. देवगड – मोंड, दाभोळे.- वैभववाडी- उंबर्डे. वेंगुर्ला – शिरोडा, म्हापण, कोचरा.कुडाळ-  ओरोस बुद्रुक, नेरुर तर्फे हवेली. सावंतवाडी- दाणोली बाजार,तसेच मतमोजणी दिनांक 20 डिसेंबर रोजी सावंतवाडी शहर आठवडे बाजार बंद ठेवण्यात येणार आहे.अशी माहिती अपर जिल्हाधिकारी डॉ.जयकृष्ण फड यांनी दिली.

            राज्य निवडणूक आयोगाकडून ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम दिनांक 9 नोव्हेबर 2022 रोजी जाहीर झालेला असून रविवार दिनाक 18 डिसेंबर 2022 रोजी जिल्ह्यातील ग्रामपंचायतीसाठी मतदान होत  आहे. सदर दिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी आठवडा बाजार भरविण्यात येतो. त्या त्या ठिकाणचा आठवडा बाजार मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावामतदान सुरळीतपणे पार पाडावे, याकरीता तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने  बंद ठेवणे आवश्यक आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा