You are currently viewing देवबाग मोबारवाडीतील रॉयल जेटीच्या ठिकाणची निलेश राणेंकडून पाहणी

देवबाग मोबारवाडीतील रॉयल जेटीच्या ठिकाणची निलेश राणेंकडून पाहणी

मालवण

देवबाग गावातील पर्यटन व्यवसायासाठी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी दहा वर्षांपूर्वी देवबाग मोबारवाडी मध्ये रॉयल जेटी मंजूर केली होती. मात्र २०१४ मध्ये शिवसेनेच्या आमदार, खासदारांच्या दुर्लक्षामुळे हे काम अद्याप रखडले आहे. याठिकाणी भाजपाचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी बुधवारी भेट दिली. या कामाच्या सद्यस्थितीची शासन पातळी वरून माहिती घेऊन हे जेटीचे काम लवकरात लवकर हाती घेण्यात येईल, अशी ग्वाही श्री. राणे यांनी यावेळी दिली.

यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, जिल्हा बँकेचे संचालक बाबा परब, माजी नगराध्यक्ष अशोक तोडणकर, अविनाश सामंत यांच्यासह संदीप तांडेल, सचिन धुरी, दिलीप पेडणेकर, गणेश कुमठेकर, किरण धुरी, केतन तोरस्कर, दाजी वायंगणकर, मयूर पेडणेकर, महेंद्र धुरी, उचित तांडेल, कैलास तांडेल, गणेश राऊळ, हर्षद कुमठेकर, रवींद्र तांडेल, तुकाराम तांडेल, रुपेश कांबळी, विशाल धुरी, अनिल तोरस्कर, किशोर तांडेल, बंटी कुबल, यशवंत बांदेकर यांच्यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा