You are currently viewing मुंबई गोवा महामार्गावर मॅजिक व टवेरा गाडीचे अपघात!

मुंबई गोवा महामार्गावर मॅजिक व टवेरा गाडीचे अपघात!

मॅजिकच्या दर्शनी भागाचे झाले नुकसान ; सुदैवाने जीवितहानी टळली

कणकवली

कणकवली बस स्थानकाच्या दिशेने मॅजिक चालली होती. अशातच कणकवली तहसीलदार कार्यालयाकडून तवेरा कार ओव्हरब्रिज खालून बस स्थानकाच्या दिशेने जाण्यासाठी टर्न घेत असताना हा अपघात झाला. अपघातात मॅजिकच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले.

आज दुपारच्या सुमारास कणकवली येथे प्रवाशांना घेऊन जाणारी मॅजिक गाडी तहसीलदार कार्यालयाच्या समोर आली असता तहसीलदार कार्यालयाकडून जाणाऱ्या तवेरा कार चालकाने सर्विस रस्त्यावर अचानक टर्न घेतल्यामुळे मॅजिक गाडी तवेरा कारला मागावून धडकली. यात मॅजिक चे मोठे नुकसान झाले. अशा प्रकारचे अपघात कणकवलीत काही ठिकाणी होतच असतात. परंतु आवश्यक तिथे गतिरोधक नाहीत, आवश्यक तिथे आरसे नाहीत त्यामुळे मागून – पुढून येणाऱ्या वाहनाचा अंदाज सर्विस रस्त्यावर येताना येत नाही. अशातच हे अपघात घडत असल्याचे चित्र आहे.

हायवे ठेकेदार व प्राधिकरणाने शासकीय कार्यालयांजवळ गतिरोधक व आरशांची व्यवस्था करणे गरजेचे आहे. त्यामुळे समोरून किंवा मागून येणाऱ्या वाहनाचा अंदाज येईल व अपघात टाळेल.

प्रतिक्रिया व्यक्त करा