You are currently viewing ज्योत दिव्याची विझल्यावरती….

ज्योत दिव्याची विझल्यावरती….

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री संजना जुवाटकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

*अनलज्वाला ८/८/८*

*ज्योत दिव्याची विझल्यावरती…..*

थोडे माझे..थोडे तुमचे चुकल्यावरती
गोड हासुया, चूक काय हे कळल्यावरती

नको ताणुया भांडण इतके मरण्याइतपत
कळेल.. ‘जीवन सुंदर आहे,’ जगल्यावरती

घडायचे ते घडतच असते त्या..त्या.. वेळी
हृदय फाटते आप्त आपुले नसल्यावरती

श्रावणधारा वनास देती अधिक झळाळी
उणे भासते ग्रीष्म झळांनी सुकल्यावरती

पिऊन घेऊ वारा वेडा माळावरचा
नको वाटते वय दोघांचे सरल्यावरती

पुन्हा वाचुया पाने सारी यौवनातली
कळेल किंमत पान रुपेरी गळल्यावरती

वेळ संपते माझे.. माझे.. करता करता
खेळ थांबतो ज्योत दिव्याची विझल्यावरती

सौ. संजना विद्याधर जुवाटकर
कळवा, ठाणे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा