बांदा
जीवन प्राधिकरण विभागाच्या पाण्याच्या जलवाहिनीवर काम करणाऱ्या परप्रांतीय कामगाराच्या डोक्यावर अज्ञाताने वार केल्याने कामगार गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून अधिक उपचारासाठी ओरोस जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना काल रात्री घडली. याची नोंद बांदा पोलीस ठाण्यात करण्यात आली नाही.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जीवन प्राधिकरण विभागाची सासोली ते वेंगुर्ले अशी पाणी वाहून नेणाऱ्या जलवाहिनीचे काम सुरु आहे. सध्या डेगवे येथे काम सुरु आहे. काल रात्री उशिरा काम आटोपून आपल्या झोपडीत आराम करणाऱ्या या कामगाराच्या डोक्यात अज्ञात इस्माने जोरदार प्रहार केला. त्यात तो खाली कोसळला. वार करून संशयितने तेथून पलायन केले. इतर कामगारांनी त्याला उपचारासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. मात्र त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने अधिक उपचारासाठी ओरोस जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची बांदा पोलिसात नोंद नसल्याचे सांगण्यात आले.