बांधकाम कामगारांनी खोट्या आमिषाला बळी पडू नये
सिंधुदुर्गनगरी
बांधकाम कामगारांनी इतर कोणत्याही खोट्या आमिषाला बळी न पडता नोंदणी व नूतनीकरण करुन घ्यावे. याबाबातीत आपली फसवणूक झाल्यास हे कार्यालय जबाबदार रहाणार नाही. तसेच अतिरिक्त रक्कम मागणी करणाऱ्या व्यक्ती विरुध्द नजिकच्या पोलीस ठाण्यामध्ये परस्पर तक्रार नोंदवावी. असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी स.ध. कोल्हाळ यांनी केले आहे.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या असंघटित कामगारांची नोंदणी, नूतनीकरण व विविध योजना लाभ वाटपाचे काम सरकारी कामगार अधिकारी , सिंधुदुर्ग कार्यालयामार्फत केले जाते.
या कामकाजासाठी कोणत्याही खासगी प्रतिनिधी अथवा एजंट, दलाल यांची नेमणूक करण्यात आलेली नाही. संबंधीत कामगारांना अर्ज नोंदणीसाठी वार्षिक 1 रु. व नूतीनकरणसाठी वार्षीक 1 रु. शुल्क आकारण्यात येत असून त्याची रितसर पावतीही देण्यात येते. या व्यतिरिक्त या कार्यालयाकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही.