You are currently viewing ग्रा. पं. ची सत्ता भाजपकडे द्या, साडेआठ वर्षातील विकासाचा बॅकलॉग भरून काढू

ग्रा. पं. ची सत्ता भाजपकडे द्या, साडेआठ वर्षातील विकासाचा बॅकलॉग भरून काढू

भाजपा प्रदेश सचिव, माजी खा. निलेश राणेंची बांदिवडे गावच्या बैठकीमध्ये ग्वाही

मालवण

ग्रामपंचायतीची सत्ता भाजपाकडे द्या, साडेआठ वर्षांचा विकासाचा बॅकलॉग भरून काढू, असा विश्वास भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी बांदिवडे (ता. मालवण) येथील बैठकीत बोलताना दिला आहे. येथील स्थानिक आमदाराकडून गावचा विकास नाकारला जात आहे, त्याला मतदानातून उत्तर द्या, असे आवाहनही त्यांनी केले.

भाजपा नेते निलेश राणे यांनी सोमवारी रात्री त्रिंबक आणि बांदिवडे गावाला भेट देऊन भाजपा पुरस्कृत पॅनलच्या उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी बांदिवडे येथे आयोजित छोटेखानी सभेत ते बोलत होते. यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, जिल्हा बँकेचे संचालक बाबा परब, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष राजन गावकर, महेश मांजरेकर, जेरॉन फर्नांडिस, प्रफुल्ल प्रभू, संतोष गावकर, प्रफुल्ल प्रभू, सरपंच प्रविणा प्रभू, उपसरपंच किरण पवार, शंकर आईर, सतीश बांदिवडेकर, उदय सावंत, संदीप आईर, आशिष चेंदवणकर, विनोद चेंदवणकर, बबन मुणगेकर, सुनील घाडी, बबन मांजरेकर, नागेश परब, संदेश पवार, संतोष घाडी, दिनेश परब, प्रकाश मेस्त्री, जयमल राणे, मंगेश राणे, सूर्यकांत पवार यांच्यासह सरपंच पदाचे उमेदवार उमेश शंकर परब, सदस्य पदाचे उमेदवार विकास घाडी, अंजली घाडीगावकर, स्वाती आईर, जयप्रकाश बांदिवडेकर, तन्वी कासले, शाहूलखन बांदिवडेकर आदी उपस्थित होते.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा