कणकवली
भाजपाची सत्ता असेल तिथेच निधी, असे जर दबाव तंत्राचे राजकारण भाजपाने सुरू केले असेल तर जिल्ह्यातील सर्व पक्षांनी पेटून उठले पाहिजे. जनतेच्या विरोधात भाजपाने सुरु केलेली दडपशाही मोडीत काढण्याची गरज आहे.खेदजनक व दुर्दैवी वक्तव्य आम. नितेश राणे यांनी केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी असे राजकारण करायचे ठरवले आहे का? याचे उत्तर अगोदर त्यांनी द्यावे असा टोला मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी लगावला आहे.आतापर्यंत राणेंच्या दहशतवादावर बोलणाऱ्या दिपक केसरकर यांनी राणेंचा दहशतवाद आता संपला हे जाहीर करावे असे आव्हान उपरकर यांनी दिले आहे.
कणकवली येथे आयोजीत पत्रकार परिषदेत मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर बोलत होते.
ते म्हणाले,राज्यात भाजपाकडून दबाव तंत्राचे राजकारण सुरू असून भाजपाचे, आमदार ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये नांदगाव मध्ये भाजपाच्या विचाराचा सरपंच द्या अन्यथा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व पालकमंत्र्यांसह मी निधी देणार नाही असे खेदजनक व दुर्दैवी वक्तव्य आमदार नितेश राणे यांनी केले आहे. भाजपाची सत्ता असेल तिथेच निधी, असे जर दबाव तंत्राचे राजकारण भाजपाने सुरू केले असेल तर जिल्ह्यातील सर्व पक्षांनी पेटून उठले पाहिजे. जनतेच्या विरोधात भाजपाने सुरु केलेली दडपशाही मोडीत काढण्याची गरज आहे. निवडणूकीनंतर या दडपशाही विरोधात सर्व पक्षांनी पेटून उठले पाहिजे असे सांगताना उपरकर म्हणाले,राज्य व केंद्र सरकार कडून थेट निधी ग्रा प ला देण्यात येतो. भाजपा च्या विचारांचा सरपंच असलेल्या जिल्ह्यातील किती ग्रामपंचायतींचा विकास केला असा सवाल उपरकर यांनी उपस्थित केला.जिल्हातील भाजप वगळून इतर ग्रामपंचायतींना निधी देणार नाहीत का? जिल्ह्यातील भाजपच्या ग्रामपंचायतीमध्ये आतापर्यंत किती निधी दिला हे प्रथम जाहीर करावे.भाजपची सत्ता असलेल्या ग्रामपंचायतींच्या हद्दीमध्ये आजही खड्डेमय रस्ते, काही ग्रामपंचायतींच्या हद्दीमध्ये स्ट्रीट लाईट नाही, दवाखान्यात डॉक्टर नाही, रेशनवर धान्य नाही अशी टीका श्री. उपरकर यांनी केली. आमदार नितेश राणे यांच्या संदर्भात शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी राणेंच्या वक्तव्याचे समर्थन करताना आतापर्यंत राणे कुटुंबाचा दहशतवाद संपवण्यासाठी शिवसेनेत गेल्याचे वक्तव्य केले. परंतु केसरकर यांचे खरे रूप समोर आले. दीपक केसरकर यांनी राणेंच्या वक्तव्याचे समर्थन करत असताना दहशतवाद संपल्याची भूमिका घेत आता राणेंसोबत केसरकर बंद खोलीत चर्चा करत असल्याचा आरोपही श्री उपरकर यांनी केला. राष्ट्रवादी, त्यानंतर शिवसेना व आता पुन्हा शिंदे गट असे ढोंगीपणा केसरकर यांनी केला. आतापर्यंत राणेंच्या दहशतवादावर बोलणाऱ्या केसरकर यांनी राणेंचा दहशतवाद आता संपला हे जाहीर करावे असे आव्हान उपरकर यांनी दिले आहे. दीपक केसरकर यांची दहशतवाद विरोधाच्या मुद्द्यावरून राजकीय कारकीर्द सुरू झाली. पण डीएड, बीएड, शिक्षक प्रश्न शिक्षण मंत्री असलेले दीपक केसरकर सोडवतील, काय, गळक्या शाळा ना निधी देतील काय, असा देखील सवाल उपरकर यांनी उपस्थित केला.