You are currently viewing निगडी येथील कवयित्री कोठेकर योगिता राष्ट्रीय विक्रमासह साहित्य साधना पुरस्काराने सन्मानित

निगडी येथील कवयित्री कोठेकर योगिता राष्ट्रीय विक्रमासह साहित्य साधना पुरस्काराने सन्मानित

*निगडी येथील कवयित्री कोठेकर योगिता राष्ट्रीय विक्रमासह साहित्य साधना पुरस्काराने सन्मानित*

पुणे (प्रतिनिधी) –

गीता जयंती ‘ दिनाच्या शुभमुहूर्तावर हिरकणी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या विद्यमाने कै. काशीबाई यादवराव ( पाटील ) शेवाळे यांच्या स्मरणार्थ राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा बहाई अकादमी, पाचगणी, महाबळेश्वर येथे आयोजित करण्यात आला होता.
हिरकणी साहित्य गौरव समूहाच्या संस्थापिका श्रीम.वनमाला पाटील यांच्या कल्पनेने समूहातील ३६ जिल्ह्यातील ३६ हिरकण्यांचे अष्टाक्षरी प्रकारातील वेगवेगळ्या विषयांवर आधारित ३६ संपादित पुस्तके तसेच इतर वैयक्तिक पुस्तके मिळून एकूण ६० पुस्तकांचे एकाच दिवशी एकाच ठिकाणी प्रकाशन करण्यात आले.
या अनोख्या उपक्रमाची ‘ The Great INDIAN book of Records ‘ मध्ये करण्यात आली.

यावेळी निगडी पुणे येथील हिरकणी प्रतिनिधी लेखिका ,कवयित्री ,शिक्षिका यांना संपादित पुस्तक प्रकाशनासाठी राष्ट्रीय विक्रमाचे सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि मेडल देऊन गौरवण्यात आले . तसेच याचवेळी हिरकणी साहित्य समूहातील सक्रिय सहभाग व लेखनाबद्दल ‘ हिरकणी साहित्य साधना ‘ पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी बहाई अकादमीचे लेसन आझादी, इंडियन रेकॉर्डस् चे सुनील पाटील, अध्यक्षा जागृती निखारे उपस्थित होते.
याप्रसंगी रंगलेल्या संध्याकालीन कविसंमेलनात सर्वांनी अष्टाक्षरी कविता सादर केल्या. यात”बाप” कविता सादर करून योगिता कोठेकर यांनी सर्वांची मने जिंकून घेतली . त्यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. राष्ट्रीय विक्रमाची नोंद व हिरकणी साहित्य साधना पुरस्कार अशा दुहेरी यशाबद्दल कोठेकर योगिता यांचे चौफेर कौतुक सुरू असून आप्तगण , पालक,विद्यार्थी यांनी त्यांचे अभिनंदन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा