कोकणातील पहिली बांबू टिश्यू कल्चर लॅब

कोकणातील पहिली बांबू टिश्यू कल्चर लॅब

वैभववाडीत बांबूच्या एक लाख रोपांची निर्मिती करणार

-कृषी महाविद्यालयाचे संचालक संदीप पाटील

वैभववाडी
बदलत्या हवामानाचा विचार करता सध्या बांबूकडे शेतकरी एक खात्रीशीर पीक म्हणून पहात आहेत. कारण अवकाळी पाऊस, रोग व किडीचा फारसा दुष्परिणाम बांबू पिकावर होत नाही. तसेच बहुतांशी राज्यात प्लास्टिक बंद झाल्याने बांबूची वाढती मागणी लक्षात घेता वैभववाडी येथे सुमारे 35 लाख रुपये खर्च करून बांबू टिश्यू कल्चर लॅब उभी राहत असून त्यातून या वर्षांपासून बांबूच्या एक लाख रोपांची निर्मिती करणार असल्याची माहिती सांगुळवाडी येथील कृषी कॉलजेचे संचालक संदीप पाटील यांनी दिली.
कोकणात बांबू लागवडी साठी सुपीक पडीक जमीन मोठ्या प्रमाणात असून शेतकरी मोठ्या प्रमाणात बांबू लागवडीकडे वळल्याचे चित्र दिसत आहे. बांबू लागवडीतून शेतकऱ्याची आर्थिक उन्नती होऊ शकते हे आता लक्षात आले आहे. त्यासाठी बांबूच्या रोपांची गरज लक्षात घेता वैभववाडी तालुक्यातील श्री अनगर सिद्ध शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने सांगुळवाडी येथील कृषी कॉलेज येथे सुमारे 35 लाख रुपये खर्च करून हायटेक ट्युशी कल्चर लॅब उभी राहिली आहे. त्याला लागणारी मशीनरी आणि इतर खर्च 35 लाख रुपये आल्याचे पाटील म्हणाले. बायोटेक या विषयात जपान मध्ये पीएचडी घेतलेले डॉ वाडेकर हे लॅबचे प्रमुख असणार आहेत. तर बेंगलोर येथील विषयावर तज्ज्ञ असलेले डॉ भारती यांचे मार्गदर्शन लाभणार आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली.
वैभववाडी, कणकवली, राजापूर या परिसरात आढळून येत असलेला पारंपरिक चिवा काठीला मोठी मागणी असते. त्याचा दर्जा उत्कृष्ट असून त्याला शेकडो वर्षे मर मर नाही, असे त्यात बहुगुण आहेत. या चिवा काठीला शंभर वर्षे मार्केट असून ते आजही टीकून आहे. या परिसरातील व्यापारी शेतकऱ्यांना चिव्याच्या कंदमूळाची लागवड करण्याची शिफारस करतात. परंतू मोठ्या प्रमाणात लागवड करायची झाल्यास तेवढी कंदमूळे उपलब्ध होत नाहीत. त्यासाठी या लॅब मधून चिवा जातीची रोप उपलब्ध करून देणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली. त्याच बरोबर तुल्डा, माणगा जातीची इत्यादी रोप एक लाख रोप पुढच्या मे, जून पर्यंत उपलब्ध करून देणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली. या मुळे कोकणात बांबूच हब निर्माण होऊन त्यातून प्रक्रिया उद्योग उभे राहतील असा विश्वास व्यक्त होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा