You are currently viewing कवयित्री डॉ. निलांबरी गाणू यांची सर्वद फाऊंडेशन मुंबईचा राज्यस्तरीय स्टार अवॉर्ड साहित्यिक पुरस्कारासाठी निवड

कवयित्री डॉ. निलांबरी गाणू यांची सर्वद फाऊंडेशन मुंबईचा राज्यस्तरीय स्टार अवॉर्ड साहित्यिक पुरस्कारासाठी निवड

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री डॉ. निलांबरी गाणू यांची सर्वद फाऊंडेशन मुंबईचा राज्यस्तरीय स्टार अवॉर्ड साहित्यिक पुरस्कारासाठी निवड*

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री डॉ. निलांबरी गोखले गाणू यांची लेखनातील वैशिष्ठ्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरी बद्दल सर्वद फाऊंडेशन मुंबई आयोजित *विश्लेशा चितळे* या राज्यस्तरीय स्टार अवॉर्ड साहित्यिक पुरस्कारासाठी निवड केली आहे. सदरचा अवॉर्ड प्रदान कार्यक्रम २१ जानेवारी २०२३ रोजी दादरच्या सानेगुरुजी विद्यालय, भिकोबा वामन पाठारे मार्ग, शिवाजी पार्क, दादर (पश्चिम) ४०००२८ येथे पार पडणार आहे.
डॉ. निलांबारी गाणू यांनी संत गाडगेबाबा, अहिल्याबाई ओळकर यांच्यावर अत्यंत प्रभावी लेखन केले आहे. त्यांच्या सहा कादंबरी देखील प्रकाशित झाल्या आहेत आणि काही प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. जवळपास ७०० पेक्षा जास्त मराठी कविता, ३५० च्या वर हिंदी २० गुजराती, ४ ब्रज भाषेतील कविता त्यांनी लिहिल्या आहेत. नीलांबर हा कराठी काव्यसंग्रह प्रकाशित झाला असून इबादत हा हिंदी काव्यसंग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहे. १२५ पेक्षा जास्त मराठी कथा, भारुड, भलरी, पथनाट्य, लघुकथा असं विविधांगी साहित्याची निर्मिती त्यांनी केली आहे. त्यांना इंदोरच्या अहित्या फाऊंडेशनचा पुरस्कार देखील प्राप्त झाला असून इतरही अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
मुंबईच्या सर्वद फाउंडेशनने लेखनातील वैशिष्ठ्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत डॉ. निलांबरी गाणू यांची स्टार अवॉर्ड साहित्यिक पुरस्कारासाठी निवड करून त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा