You are currently viewing खुडी-पन्हाळेवाडी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत निवडणुकीवर टाकलेला बहिष्कार मागे.

खुडी-पन्हाळेवाडी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत निवडणुकीवर टाकलेला बहिष्कार मागे.

नितेश राणेंसोबत सकारात्मक चर्चा; निवडणूक संपताच प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन…

देवगड

तालुक्यातील खुडी-पन्हाळेवाडी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत निवडणुकीवर टाकलेला बहिष्कार आमदार नितेश राणे यांच्या आश्वासनामुळे मागे घेण्यात आला. पन्हाळेवाडीमध्ये जाणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरण व खडीकरणाची गेली कित्येक वर्ष होत असलेली मागणी अद्याप पूर्ण झाले नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकत मतदान करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यांनी आज आपली समस्या श्री. राणे यांच्याकडे मांडली. यावेळी निवडणूक संपताच हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन श्री. राणे यांनी उपस्थितांना दिले. त्यानुसार बहिष्कार मागे घेण्यात आला आहे.

पन्हाळेवाडी मध्ये जाणारा रस्ता अतिशय खराब असून यावरून चालणे ही मुश्किल झाले होते. या रस्त्यावरून जाताना वृद्ध लहान मुले शाळकरी मुले यांचे प्रचंड हाल होत होते. ही समस्या लक्षात घेता तत्कालीन तहसीलदार श्रीकृष्ण ठाकूर यांना निवेदन देऊन ग्रामस्थांनी बहिष्कार जाहीर केला होता..भाजपा नेते वैभव बिडये यांच्याबरोबर ग्रामस्थांनी आमदार नितेश राणे यांची भेट घेतली. यावेळी आमदार नितेश राणे यांनी निवडणूक आटोपताच हा प्रश्न सोडवू ,असे आश्वासन दिले आहे. यावेळी ग्रामस्थांनी आपण भाजपाच्या पाठीशी आहोत व मतदानाचा हक्क बजावू, असे आश्वासन दिले. यावेळी खुडी पन्हाळेवाडी मधील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा