आरोस विद्या विकास हायस्कूलला सुष्मदर्शक भेट
बांदा
शाळेतील शिक्षक हेच खरे सुष्मदर्शक आहेत. त्यांचे मार्गदर्शन घ्या व मोठे बना. विद्यार्थी दशेत आपल्याला काही अडथळे, कठीण प्रसंग आलेत तर आम्ही तुम्हाला योग्य ते सहकार्य करू, अशी ग्वाही मळेवाड कोंडूरे गावचे उपसरपंच हेमंत मराठे यांनी दिली.
कोंडूरे गावचे सुपुत्र प्रमोद मुळीक यांनी आपली मुलगी मानसी हिच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूलच्या प्रयोशाळेसाठी सुष्मदर्शक (मायक्रोस्कोप) भेट दिला. यावेळी श्री. मराठे बोलत होते. आरोस सरपंच शंकर नाईक, शिक्षक पालक समिती माजी उपाध्यक्ष प्रमोद मुळीक, सुधीर मुळीक, मुख्याध्यापक विद्याधर देसाई, शिक्षक अनिल नाईक, लाडू सावंत, समिधा मांजरेकर, श्रद्धा परब, देवयानी चव्हाण, शिक्षकेतर कर्मचारी तानाजी खोत, लक्ष्मण शेळके आदी उपस्थित होते.
उपसरपंच मराठे म्हणाले की, जे डोळ्यांनी दिसत नाही ते सुष्मदर्शकने दिसणार आहे. यासाठी सखोल अभ्यास करा असे सांगत त्यांनी शाळेची एकंदरीत प्रगती, निकाल, शिस्त, शिक्षकवर्ग याबद्दल गौरवोद्गार काढले. त्यांनी इयत्ता पाचवी ते दहावी मधून यंदा पहिल्या तीन क्रमांकाने उत्तीर्ण होण्याऱ्या मुलींसाठी रुपये पाचशे रोख रकमेची पारितोषिक घोषित केली. किशोरवीन मुलींसाठी शंभर सॅनिटरी न्यापकिन्सची सोय केली. विद्यालयाला प्रयोशाळेसाठी पाच हजार रुपये देणगी मुख्याध्यापकांकडे सुपूर्द केली. तर प्रमोद मुळीक मित्रमंडळाच्या वतीने रुपये दहा हजार रोख रक्कम मुख्याध्यापकांकडे सुपूर्द केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तानाजी वरक यांनी केले. तर आभार मुख्याध्यापकांनी मानले.