कणकवली :
कणकवली तालुक्यातील तरंदळे गावातील अनेक सक्रिय कार्यकर्त्यांनी बाळासाहेबाची शिवसेना पक्षात प्रवेश केला. यावेळी ब्रिगेडिअर सुधीर सावंत, जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, तालुकाप्रमुख भूषण परुळेकर, विधानसभा क्षेत्र प्रमुख सावंत, भास्कर राणे, महेश तेली, यांच्यासह प्रमुख पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. तरंदळेतील पक्ष प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये सागर गवाणकर, प्रदीप कदम यांचा समावेश आहे.