कुडाळ / कसाल :
१२ डिसेंबर रोजी कसालचे ग्रामदैवत श्री देवी पावणाई रवळनाथ मंदिराचा वार्षिक जत्रोत्सव होणार आहे. त्यानिमित विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. १२ डिसेंबर रोजी सकाळी विधिवत पूजा, सकाळी ८ ते रात्री ११ वाजेपर्यंत ओटी भरणे, नवस फेडणे, नवस बोलणे, रात्री श्रींची पालखी मिरवणूक व मंदिराभोवती प्रदक्षिणा, १२ वा., बाळकृष्ण गोरे दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होणार असून १३ रोजी सकाळी दहीकाला होणार आहे. भाविकांनी जत्रोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पावणाई रवळनाथ देवस्थान कमिटीने केले आहे.