You are currently viewing अवमानकारक विधान करणार्‍या भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचा सावंतवाडीत निषेध…

अवमानकारक विधान करणार्‍या भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचा सावंतवाडीत निषेध…

सावंतवाडी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विरोधात अवमानकारक विधान करणार्‍या राज्याचे मंत्री तथा भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात आज निषेध करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस ,आरपीआय आणि बौध्द समाजांच्या माध्यमातून येथील समाज मंदीरकडे हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, युवती जिल्हाध्यक्ष सावली पाटकर, मोहन जाधव,अ‍ॅड. एस. व्ही. कांबळे, आर. जे. चौकेकर, यशवंत डींगणेकर आदी उपस्थित होते. कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शाळा उघडण्यासाठी लोकांकडे भीक मागितली, असे विधान करून महापुरुषांचा अवमान करणाऱ्या भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांचा जाहीर निषेध येथील समाज मंदिरकडे राष्ट्रवादी व आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी केला. पाटील यांनी नुकतेच हे विधान करून महापुरुषांचा अवमान केल्याने राष्ट्रीय महापुरुषांचा अहवाल करण्याची स्पर्धा जणू भाजपच्या नेत्यात सुरू असून पाटील यांच्या या विधानाचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी व आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी संघटित होत आज दुपारी येथील समाज मंदिरकडे जाहीर निषेध व्यक्त केला. प्रारंभी राष्ट्रवादी शहराध्यक्ष पुंडलिक दळवी व मान्यवरांच्या हस्ते डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा