कणकवली :
कलमठ – नाडकर्णी नगर, येथील रहिवासी अरविंद वामन कारेकर (८१) यांचे शुक्रवारी आकस्मिक निधन झाले. कारेकर यांनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मध्ये आपली सेवा बजावली होती. काही काळ त्यांनी प्रभारी गटविकास अधिकारी म्हणूनही कार्य केले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. नाडकर्णी नगर रहिवासी संघाचे ते क्रियाशील सदस्य होते. कुडाळ येथील सुवर्ण व्यावसायिक राजू पाटणकर यांचे ते सासरे होत .