You are currently viewing कुडाळ येथे १८ डिसेंबरला मराठा समाजाचा भव्य वधू-वर सूचक मेळावा…

कुडाळ येथे १८ डिसेंबरला मराठा समाजाचा भव्य वधू-वर सूचक मेळावा…

कुडाळ

येथील जिल्हा मराठा समाज बांधव संघटनेच्या वतीने भव्य वधू-वर सूचक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा १८ डिसेंबरला कुडाळ येथील बॅ. नाथ पै विद्यालयात घेण्यात येणार आहे, अशी माहिती संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्षा नीलम धुरी यांनी दिली. याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिले.
त्यात असे नमूद करण्यात आले आहे की, हा मेळावा सकाळी ठीक १०.३० वाजता सुरू होणार आहे. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत. तरी मोठ्या संख्येने समाज बांधवांनी या मेळाव्यात उपस्थित रहावे, असे आवाहन धुरी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी श्री. सहासेन सावंत 9604949669, श्री. राजेंद्र तिरोडकर 9420307331, प्रा. नीलम धुरी 9403562039 यांच्याशी संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा