*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी बाबा ठाकूर यांची अप्रतिम काव्यरचना*
*भूतकाळ चघळत नाही!पण…!*
स्मृतीही थकल्या आता …
अजूनही शाळेच्या बाकावर ती
अजूनही माझी वाट पाहते ….
सांगितलं तिला वय झालं आपलं
तरीही आजही तिने पाचवा बाक
सोडला नाही..ती माझी वाट पाहते….!
तसा मी भूतकाळ चघळत नाही
सुखात मला सगळेजण हवे असतात
पण दुःखात माझी मुलगी मला जवळ हवी असते ….
ती असली की माझे गुलाब फुलतात..!
आता माझ्या आरश्याचं वय झालयं
त्याच ही काहीतरी बिनसलय
सारखा माझा भूतकाळ चघळत बसतो
अन् सुरकुत्या पुसायला विसरतोय..!
कैदेत या भूतकाळाच्या अजून
असा किती काळ राहू …..
मलाही ऋण फेडायचे!माझ्यातल्या लहान मुलाचे….! तो जत्रेत हरवला
त्याला मधेच असा कसा सोडून जाऊ ..!
तो मला !पुन्हा पहिल्यापासून जगण मागतो..
म्हणतो ..तू एकदा तरी आईशी बोल
कस सांगू त्याला !आई तर आकाशी निघून गेली….
भूतकाळ चघळायचा नसतो मला
पण खरचं आई भूतकाळात गेली..??
बाबा ठाकूर धन्यवाद