You are currently viewing झाराप गावचे सुपुत्र साहित्यिक श्री.लक्ष्मण कुशा पाटकर यांना मुंबईतील सर्वद फाऊंडेशनचा २०२३ सालचा मानाचा उत्कृष्ट कवी/साहित्यिक पुरस्कार जाहीर

झाराप गावचे सुपुत्र साहित्यिक श्री.लक्ष्मण कुशा पाटकर यांना मुंबईतील सर्वद फाऊंडेशनचा २०२३ सालचा मानाचा उत्कृष्ट कवी/साहित्यिक पुरस्कार जाहीर

*झाराप गावचे सुपुत्र साहित्यिक श्री.लक्ष्मण कुशा पाटकर यांना मुंबईतील सर्वद फाऊंडेशनचा २०२३ सालचा मानाचा उत्कृष्ट कवी/साहित्यिक पुरस्कार जाहीर*

बृहन्मुंबई महानगरपालिकेत विभाग निरिक्षक या पदावर कार्यरत असणारे कुडाळ तालुक्यातील झाराप गावचे सुपुत्र साहित्यिक, कवी, सुत्रसंचालक श्री.लक्ष्मण कुशा पाटकर यांना मुंबईतील सर्वद फाऊंडेशनचा २०२३ साल साठी उत्कृष्ट कवी /साहित्यिक हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार वितरण समारंभ दिनांक २१ जानेवारी २०२३ रोजी, साने गुरुजी विद्यालय, भिकोबा वामन पाठारे मार्ग, शिवाजी पार्क, (कॅटरिंग कॉलेजच्या मागे) दादर येथे संपन्न होईल.
गेली अनेक वर्षे लक्ष्मण पाटकर हे एक उत्कृष्ट कवी, साहित्यिक म्हणून ओळखले जात आहेत. एक सुस्वभावी, परोपकारी, ईतरांसाठी तळमळीने काम करणाऱ्या या सहृदयी कवीला २०२२ चा राज्यस्तरीय कुसुमाग्रज काव्य पुरस्कार आणि काव्यांजली पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका साहित्यिकाला साहित्य क्षेत्रातील दैदिप्यमान कार्यासाठी असा मानाचा पुरस्कार मिळणे नक्कीच जिल्ह्यासाठी गौरवास्पद आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen − thirteen =