You are currently viewing शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रूपयांची सरसकट मदत दया..

शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रूपयांची सरसकट मदत दया..

आमदार नितेश राणे यांची मागणी

सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत दिले शासनाला पत्र

कणकवली
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासात शेतकरी आत्महत्या सारख्या घटनांची नोंद होणे सरकारला भूषणावह असणार नाही. म्हणून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने हेक्टरी ५० हजार रूपयांची सरसकट मदत जाहीर करून ती त्वरीत मिळेल यासाठी कार्यवाही करण्यात यावी, असे पत्र आमदार नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्या मार्फत शासनाला दिले आहे.
आमदार नितेश राणे यांनी शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मदत मिळण्यासाठी शासनाला जिल्हाधिकारी यांचेकडे पत्र दिले आहे. त्यात त्यांनी कोकणातील शेतकऱ्याला पुरेशी नुकसानभरपाई न मिळाल्यास आत्महत्या करेल अशी चिंता व्यक्त केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दिनांक १३ , १४ व १५ ऑक्टोबर रोजी झालेल्या अतीवृष्टीने जिल्ह्यातील प्रमुख पिक असलेल्या भात शेतीचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत मी यापूर्वी आपणास दिलेल्या पत्रानुसार स्थानिक स्तरावर पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सदर भातपिकाच्या नुकसानीमुळे अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांची भविष्यात मोठ्या प्रमाणावर उपासमार होणार असून त्यांना आपला घर प्रपंच चालविणे कठीण होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील इतर जिल्हयाप्रमाणे येथील शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यासारखे टोकाचे पाऊल उचलावे लागल्यास आश्चर्य वाटणार नाही.हे स्थती शेतकऱ्यांवर येऊ नये म्हणून ठोस निर्णय घ्यावेत असे आमदार श्री.राणे यांनी पत्रात म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा