महिलांच्या बचत गटाचे कर्ज माफ करा वेंगुर्ला मनसेची तहसीलदारांकडे मागणी…

महिलांच्या बचत गटाचे कर्ज माफ करा वेंगुर्ला मनसेची तहसीलदारांकडे मागणी…

खाजगी वित्तीय संस्थांच्या धोरणाबाबत नाराजी.

सिंधुदुर्ग जिल्हा बचतगटांची महिलांची चळवळ १५ ते २० वर्षापूर्वी या जिल्ह्यात मोठ्या प्रमामात सुरु झाली. या चळवळीतुन अनेक महिलांनी आपले बचतगट निर्माण केले हे बचतगट निर्माण करण्यासाठी शासनाने वेगवेगळया प्रकारचे प्रोत्साहन देऊन महिलांचे बचतगट निर्माण करुन महिलांना संघटीत करुन त्या महिलांना व्यवसाय प्रशिक्षण दिले गेले. त्यातुन अनेक बचतगटांनी शासनाच्या योजनेतुन वित्तीय संस्थेतुन कर्ज घेतले तर काही महिलांनी संस्थांनी मुद्रा व अन्य खाजगीवित्त संस्थेतुन व्यवसायाकरीता कर्ज घेतले आणि व्यवसाय सुरु केले. सुरु केलेली उत्पादने वेगवेगळया प्रदर्शनामध्ये व वेगवेगळया बाजारपेठांमध्ये आणि घरोघरी जावून विकुन स्वावलंबी बनण्याचा प्रयत्न केला.
सदर महिलांनी कच्चामाल वेगवेगळ्या बाजारपेठेतुन तसेच कोकणातील स्थानिक शेतीतुन उत्पादन होणारे कच्चामालातुन वेगवेगळे उत्पादन तयार करुन वेगवेगळ्या बाजारपेठेमध्ये विकले जातो. त्यातुन अनेक महिलांनी स्वावलंबी बनण्याचा प्रयत्न केला आहे. या स्वावलंबातुन कार्यरत असताना सदर महिलांना मार्च २०२० महिन्यापासुन लॉकडाउनच्या काळात माल विक्री करता आला नाही. लॉकडाउनच्या काळात कच्चामाल आणता आला नाही व तयार माल विकता आला नाही. त्यामुळे सर्व महिला बचतगट व मायक्रोफायनान्स घेतलेल्या कर्जाची महिला आर्थिक अडचणीत आलेल्या आहेत. मायक्रोफायनान्स घेतलेल्या महिलांना खाजगी वित्तीय संस्थांकडुन वसुलीचा तगादा लावण्याचा व वसुली करण्याचा तगादा लावला जात आहे. ती वसुली थांबविण्याची तातडीचे आदेश व्हावेत व घेतलेले कर्ज माफ करुन नव्याने अल्प व्याजदराने कर्ज महिलांना देऊन त्यांना परत सक्षम उभी करण्याकरीता शासनाने मदत करावी ही विनंती त्याचप्रमाणे नायब तहसीलदार व पुरवठा अधिकारी यांच्याशी चर्चा करून आरवली सोनसुरे येथील काही कुटुंबांना 2014 पासून धान्य मिळत नव्हते आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा करतात अधिकाऱ्यांनी जीआर मध्ये नाव समाविष्ट करून धान्य पुरविण्याचे आश्वासन दिले गावकऱ्यांनी याबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी उपस्थित मनविसे जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, उपजिल्हा अध्यक्ष आबा परब , तालुका अध्यक्ष सनी बागकर, महीला तालुका अध्यक्षा श्रध्दा परब, तालुका सचिव आबा चिपकर, मनविसे तालुकाध्यक्ष महादेव तांडेल उपतालुका अध्यक्ष विशाल माडये, शाखा अध्यक्ष आरवली सोन्सुरा गंगाराम मातोंडकर, सुचित परब ,गोविंद मातोंडकर आधी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा