You are currently viewing महान गावात ठाकरे शिवसेना गटाचे शाखाप्रमुख हेमंत शिंदे व ग्रा. पं. सदस्या हिमाली शिंदे यांचा भाजपात प्रवेश

महान गावात ठाकरे शिवसेना गटाचे शाखाप्रमुख हेमंत शिंदे व ग्रा. पं. सदस्या हिमाली शिंदे यांचा भाजपात प्रवेश

मालवण :

 

मालवणात महान गावात ठाकरे शिवसेनेच्या महान ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या हिमाली शिंदे व शाखाप्रमुख हेमंत शिंदे यांनी शिवसेनेला राम राम करत आज भाजपमध्ये प्रवेश केला. मालवण येथील भाजपा कार्यालयात भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.

यावेळी आम. वैभव नाईक, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या खोट्या आश्वासनांना कंटाळून आपण पक्षाचा त्याग करत असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे. आता भाजपाच्या शाश्वत विकासाच्या रथाचे सारथी बनून महान गावातील ग्रामस्थांची सेवा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, महिला तालुकाध्यक्षा पूजा करलकर, सुधीर साळसकर, सुदेश आचरेकर, बबलू राऊत, संतोष घाडी, मदन घाडी, अक्षय तावडे, सुहास साळुंखे, मंगेश साळसकर, दिनेश घाडी, अवधूत जाधव, नीता चव्हाण, संदीप शिंदे, प्रसाद जाधव आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 − nine =