*स्नेहल प्रकाशन परिवार सदस्य लेखक कवी प्रो.डॉ.जी.आर.उर्फ प्रवीण जोशी लिखीत अप्रतिम लेख*
*शरीर व शारीरी*
जीवन एक माणसाच्या आयुष्यात पडलेलं गोड स्वप्न ! हे स्वप्न आपण जीवनात जिवंत उपभोग त असतो ! ते स्वप्न म्हणून राहत नाही , तर चलीत चित्र पहात असतो .
जीवन , आयुष्य , जगणे
ह्या जगात वावरणे हे इतके सोपे नसते ! हा खेळ प्रत्येकाला खेळावाच लागतो ! खेळ खेळताना शरीर व शारीरी हे दोघे तिथे उपस्थित असतात !
शरीर म्हणजेच मनुष्य प्राणी ज्याची उत्पत्ती ही पांच भौतिक असते . तर शारीरी म्हणजे शरीरात असणारा जिवंतपणा उर्फ आत्मा ! आत्मा असेलतरच शरीराला वा मनुष्याला किंमत राहते अन्यथा ती व्यक्ती ह्या खेळातून बाद झाली वा मृत झालेली असते !
प्रकृती व पुरुष सांख्य सिद्धांत . प्रकृती त्रिगुणात्मक , जड , अचेतन , षढ रिपुयुक्त ,
पुरुष चेतनयुक्त यांच्या मिलनातून पांच भौतिक शरीर ! चेतना म्हणजेच आत्मा ! आत्मा म्हणजेच शारीरी याचे अधिष्ठान ह्रदय !
आत्मा मन व बुद्धी युक्त ! बुद्धीचे 3 प्रकार , धी धृती स्मृती किंवा चांगली व वाईट ! आत्मा व मन यांच्या संयोगाने कर्मेंद्रिये व ज्ञानेइंद्रिय यांचे चलनवलन होत असताना , बुद्धी त्यांना मार्गदर्शन करते . ती धृती स्मृती यांच्या विचार तारतम्याने !
शरीरांतर्गत कर्मे आत्माच करतो उदा . सर्व अवयवांचे चलनवलन ह्रदयस्पंदन रक्तातील सार व किट्ट भाग वेगळे करणे . इथे मनाचा व बुद्धीचा काही सम्बन्ध नाही !
मन हे “वायुत तुल्य वेगम ” बुद्धीचे अधिष्ठान मस्तिष्क ! मेंदूमध्ये एखाद्या कार्याची पडताळणी करून बुद्धी मनाला मार्गदर्शन करते ! इथे जर मेंदूच जर सडका असेलतर बुद्धी ही सडकीच व कर्मही तसेच घडते ! म्हणून आपण म्हणतो हा सडक्या मेंदूचा त्याच्या हातून चांगलं कर्म होणार नाहीच कारण ! तमोगुण प्राबल्य ! सगळीकडे अंधार , सज्ञानाचा अभाव ! किंवा संस्कारहीन !
कर्मेंद्रिये ही मनाच्या अधीन ! मन सांगेल ते करणार पण ते कर्म करताना
बुद्धीची मदत घेतली जाते . पण ज्ञानेइंद्रियाचे तसे होत नाही , कारण तिथे अप्रत्यक्षपणे आत्माच कार्य करतो . बुद्धिमध्ये ते कार्य मनातच लिहून घेतले जाते म्हणजे स्मृती जागृती होते ! उपभोगलेले क्षण मनात घर करतात ! सुख ,दुःख ,क्लेश कष्ट , हे मनाच्या अखत्यारित येत असले तरी ते सर्व भोगणारा आत्माच म्हणजेच शारीरी ! त्याचे पडसाद शरीरावर उमटतात !
जस काही शरीर व आत्मा एकच आहे असं वाटत पण।तस नाही ! आत्म्याचे अधिष्ठान शरीर व चांगले वाईट भोग भोगतो ते
शरीर व आत्मा ! सत्कृत्य व दुष्कृत्य करणारे “मन व बुद्धी ” इथे आत्म्याला प्रारब्ध , प्राक्तन , नशीब ह्या
विधीलिखितात भर घालतात !
पूर्वकर्म हे संचित !
संचित माझे ओखटे त्याला पाहून भय वाटे ! एखादा गरीब कष्टकरी व एखादा काहीही न करता ऐषाराम करणारा जीवात्मा ! मग इथं कुठतरी अध्यात्मिक सांगड घालावी लागते .
पुण्यवान व पापी म्हणजेच पुण्य व पाप ह्या गोष्टी जीवनात बसवाव्या लागतात ! षढरिपु ह्याच पंगतीत बसवाव्या लागतात
म्हणजेच षढरिपुयुक्त आत्मा
हा निकोप ठेवावा लागतो . म्हणजेच आचरण शुद्ध ठेवावे लागते याचाच दुसरा अर्थ मन व बुद्धीला कुठंतरी काबूत ठेवल्यास अध्यात्म साधता येतो ! ह्याचे आचरण उत्तम असेलतर तो प्रज्ञावान होतोच . फक्त त्याला संस्काराची गरज असते ! संस्कार हे वारसाहक्काने जरी येत असलेतरी त्याला संत ,महंत, प्रज्ञावंत लोकांची संगत पाहिजे . तसा अभ्यास पण पाहिजे .
“संतचरणरज लागता सहज ”
शरीर व शारीरी हा विषय गंभीर व अनव्यार्थ खोल आहे . मन व बुद्धी षढरिपु
काबूत असतीलतरच आत्मकल्याण सहज होईल !
प्रो डॉ जी आर प्रवीण जोशी
अंकली बेळगाव
कॉपी राईट 31 ऑक्टोबर 2022