मुंबई –
संपूर्ण गाबीत समाज आजही माझ्या सोबत आहे. मी राहत असलेल्या परिसरात गाबीत समाज बांधव राहत असून भांडुपगाव मध्ये महाराष्ट्र गाबीत समाज कार्यालय म्हणून ओळखले जाते ती वास्तू आज जीर्ण झाली असून ती माझ्या फंडातून बांधून देण्याचा मानस असून भांडुप, कांजूर, नाहूर या संस्थेने यासाठी पुढाकार घ्यावा असे आमदार सुनील भाऊ राऊत यांनी गाबीत समाज संस्था आयोजित विद्यार्थी गुणगौरव समारंभ सेन्ट अँथोनी सेवा संघ, शास्त्रीनगर येथे आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी प्रतिपादन केले.आमदार राऊत पुढे म्हणाले की, आजच्या विद्यार्थ्यांना आयुष्यात पुढे जाण्याचे मार्ग पुष्कळ तथापि
पुढे गेल्यानंतर आईवडील, गुरूजनाना विसरू नका त्यांच्यावर निर्व्याज प्रेम करा असे सांगितले. या प्रसंगी उद्योजक सुनील जोशी, जेष्ठ पत्रकार प्रमोद कांदळगावकर, गाबीत समाज संस्थेचे अध्यक्ष गणेश फडके, गाबीत समाज महाराष्ट्र सरचिटणीस प्रशांत कोळंबकर, अध्यक्ष जागृती पालक संस्था सतिश धुरत, डॉ. अनिल पराडकर , प्रमोद कोयडे, हरिश्चंद्र मोंडकर, प्रदिप मणचेकर, लक्ष्मण बांदकर, वैष्णवी जोशी, विजय सारंग आदी प्रभुती उपस्थित होत्या. यावेळी सतिश धुरत आणि डॉ. अनिल पराडकर यांनी आपल्या शिक्षणात खऱ्याअर्थाने शैक्षणिक दृष्ट्या आरक्षणाचा लाभ झाला. त्यामुळे आम्ही भरारी घेऊ शकलो. हाच धागा पकडून उद्योजक सुनील जोशी यांनी दोन सदस्य नियुक्ती मिळेपर्यंत आम्ही कार्यरत होतो. यामध्ये कै. नारायण उपरकर, प्रशांत कोळंबकर , सखाराम मालाडकर यांच्या प्रयत्नामुळे मागासवर्गीय दाखले मिळणे शक्य झाले. शेवटी आम्ही दर्यावर्दी आहोत. पण मला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने समाधान वाटलं असे विशद केले. सस्थेचे अध्यक्ष गणेश फडके यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेताना सांगितले की, सगळे धडे शाळेच्या पुस्तकांमधून शिकायला मिळतील असे काही नाही…. काही धडे आयुष्य, नाती व समाज यांच्याकडूनही शिकायला मिळतात असे नमूद केले. यावेळी जेष्ठ पत्रकार प्रमोद कांदळगावकर , प्रशांत कोळंबकर , डॉ. अनिल पराडकर, सतिश धुरत, वैष्णवी जोशी, केदार चव्हाण आदींनी मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले. हा रंगतदार सोहळा यशस्वी होण्यासाठी कार्याध्यक्ष संदेश उपरकर, खजिनदार रुपेश केरकर, सरचिटणीस आनंद कुबल, उपाध्यक्ष दिक्षा कुबल, कोमल केळुसकर, राजेंद्र राजम, स्वप्निल प्रभू आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन अण्णा कुबल यांनी अतिशय माफक शब्दात केले.