You are currently viewing आरोस ग्रामस्थ मंडळ, मुंबई तर्फे आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूलच्या सन २०२१/२२ मध्ये दहावीत प्रथम तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा गौरव

आरोस ग्रामस्थ मंडळ, मुंबई तर्फे आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूलच्या सन २०२१/२२ मध्ये दहावीत प्रथम तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा गौरव

सावंतवाडी

आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल, आरोस या ठिकाणी आरोस ग्रामस्थ मंडळ, मुंबईच्या वतीने शुक्रवार दिनांक ०२ डिसेंबर २०२२ रोजी श्री देव गिरोबा जत्रोत्सवाचे औचित्य साधून मागील वर्षी सन २०२१/२२ मध्ये दहावीत पहिल्या तीन क्रमांक केलेल्या मुलांचा प्रमाणपत्र व बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला. आरोस विद्याविकास हायस्कूलचा दरवर्षी १००% निकाल लागतो. त्यामुळे गावातील मुलांच्या यशाचे कौतुक आणि पुढील पिढीला प्रोत्साहन देणे असा दुहेरी हेतू नजरेसमोर ठेऊन आरोस ग्रामस्थ मंडळ, मुंबईने मुलांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता.
या कार्यक्रमाला आरोस ग्रामस्थ मंडळ मुंबई मंडळाचे सेक्रेटरी श्री.सुनील नाईक, मंडळाचे उपाध्यक्ष श्री.दयानंद नाईक, सहसचिव भाऊ मयेकर मंडळाचे, ज्येष्ठ सल्लागार श्री.पांडुरंग कळंगुटकर, मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते श्री.प्रसाद नाईक, आबा गावडे व आरोस गावचे माननीय सरपंच श्री.शंकर नाईक तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री.देसाई सर, श्री.अनिल नाईक सर, वरक सर, सावंत सर, मांजरेकर मॅडम, चव्हाण मॅडम, खोत सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वरक सर यांनी केले तसेच आरोस ग्रामस्थ मंडळ मुंबई मंडळाचे उपाध्यक्ष श्री.दयानंद नाईक यांनी मुलांना मंडळाचे उद्दिष्ट सांगून शाबासकी दिली. त्याचप्रमाणे मुलांच्या पुढील भवितव्या विषयी मार्गदर्शन केले व शाळेचा शंभर टक्के रिझल्ट लागत असल्यामुळे शिक्षकांचे विशेष कौतुक केले. आरोस गावचे सरपंच श्री.शंकर नाईक यांनी मुलांना प्रत्येक क्षेत्रात प्रगती केली पाहिजे व पुढे गेले पाहिजे, असा मौलिक सल्ला देतानाच मुंबई मंडळाच्या उल्लेखनीय कामगिरीची प्रशंसा केली. शाळेचे मुख्याध्यापक श्री.देसाई सर यांनी मुलांना मार्गदर्शन करून मुंबई मंडळाचे कौतुक केले व मंडळाच्या स्तुत्य उपक्रमासाठी आभार मानून मंडळाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. श्री अनिल सर यांनी आभार प्रदर्शन करून आरोस ग्रामस्थ मंडळ मुंबईला धन्यवाद दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा