माणूस जगतोय
माणूस जगतोय
स्वतःच्या नाही तर
दुसऱ्याच्या अपेक्षांचं
ओझं स्वतःच्या
डोक्यावर घेऊन…
माणूस जगतोय…
मी काय करावं
हे शहाणपण विसरून
तो काय म्हणतोय
त्याचाच पाठलाग करून…
माणूस जगतोय…
काल काय होतो
उद्या काय असू
यापेक्षा
आज काय आहोत
हे सोयीस्कर विसरून…
माणूस जगतोय…
उसनं पद नी
उधारीची प्रतिष्ठा
नसलेल्या इज्जतीचा
बागुलबुवा करून…
माणूस जगतोय…
शारीरिक दुखणं
बाजूला सारून
मानसिक व्याधींना
अंगावर झेलून
भावनांच्या आहारी जाऊन…
माणूस जगतोय…
(दिपी)
दीपक पटेकर
८४४६७४३१८६