दिव्यांग बंधू – भगिनी मांडणार व्यथा ; एकता दिव्यांग विकास संस्थेचे आयोजन
कणकवली :
आज शनिवारी ३ डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग दिन देशभरात साजरा केला जातो. या दिवशी सर्व दिव्यांग बंधू – भगिनी एका कुटुंबा प्रमाणे एकत्र येत एखाद्या उत्सवाप्रमाणे हा दिव्यांग दिन साजरा करतात. दिव्यांग दिन निमित्ताने कणकवली येथे एकता दिव्यांग विकास संस्था यांच्या वतीने गोपुरी आश्रम येथे दिव्यांग दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी प्रमुख उपस्थिती सामाजिक कार्यकर्ते. विचारवंत रविंद्र मुसळे, डॉ. विद्याधर तायशेटे, प्राध्यापक राजेंद्र मुंबरकर सर, जेष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर, अर्पिता मुंबरकर, समाजकल्याण आयुक्त कार्यालयाचे प्रतिनिधी उपस्थित राहुन दिव्यांगाना मार्गदर्शन करणार आहेत.
यावेळी दिव्यांग बंधू भगिनी आपल्या व्यथा देखील मांडणार आहेत. त्यामुळे कुठेतरी या बंधू भगिणींना आपले विचार मांडण्याचे आणि मन मोकळेपणाने बोलण्याचा हक्काच व्यासपीठ या निमित्ताने उपलब्ध होणार आहे. मात्र यानंतर जरी शांत राहिला असला तरी या नंतर आपल्या न्याय हक्कांसाठी दिव्यांग बंधू – भगिनी या नंतर सतत संघर्ष करणार आहेत. कारण एकता दिव्यांग विकास संस्थेचे ब्रीद वाक्यच “उठ दिव्यांग जागा हो संघटनेचा धागा हो’ असे आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक दिव्यांग बांधव आता हक्कासाठी झटणार आहेत.
जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यासाठी दिव्यांग बांधव आणि भगिनींनी ठिकाण- गोपुरी हॉल वागदे नाईक पेट्रोल पंपाच्या मागे वागदे कणकवली. वेळ सकाळी १० वाजता संपर्क. अध्यक्ष सुनील सावंत. मो. ९४२०६५४६२४. उपाध्यक्ष संजय बारंगे. मो. ७६२०४२७१३२