You are currently viewing थेट सरपंच पदासाठी बांदा ग्रामपंचायतीत सौ. अर्चना सुशांत पांगम यांचा अर्ज दाखल

थेट सरपंच पदासाठी बांदा ग्रामपंचायतीत सौ. अर्चना सुशांत पांगम यांचा अर्ज दाखल

सावंतवाडी :

 

आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बांदा ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी बांदा गाव विकास पॅनेलतर्फे थेट सरपंच पदासाठी सौ.अर्चना सुशांत पांगम यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तर सदस्य पदासाठी ९ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.

बांदा ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप विरुद्ध गाव विकास पॅनेल अशी थेट लढत होण्याची शक्यता असून काही ठिकाणी तिरंगी लढत होणार असल्याने बांदा ग्रामपंचायत निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे.

गाव विकास पॅनेलमधून थेट सरपंच पदासाठी माजी जिल्हा परिषद सदस्या सौ.अर्चना पांगम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रभाग २ मधून विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राजेश विरनोडकर, सौ.अमृता अजय महाजन, सौ.रिया रामनाथ येडवे, प्रभाग ४ मधून समीर पेळपकर, उर्मिला व्यंकटेश उरुमकर, प्रभाग ५ मधून साईप्रसाद काणेकर, सौ.देवल उदय येडवे, सौ. मनीषा सुदेश सातोसकर तर प्रभाग १ मधून गजानन शिवराम गायतोंडे, मंजू आनंद साळगावकर, लता लक्ष्मण रेडकर (हर्षद कामत पुरस्कृत पॅनेल) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.

यावेळी सुशांत पांगम, अजय महाजन, निखिल मयेकर, ओंकार नाडकर्णी, अक्षय नाटेकर, ज्ञानेश्वर येडवे, उदय येडवे, दर्शना केसरकर, शुभम पांगम आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा