You are currently viewing कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक जरा दमानं….. अमित इब्रामपूरकर

कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक जरा दमानं….. अमित इब्रामपूरकर

४ कोटी खर्च करुन ३५० बेडच्या फुशारक्या मारणाऱ्यांनी जनतेच्या चांगल्या आरोग्य सुविधेकडे लक्ष द्यावे- मनसेचा सल्ला

आमदार वैभव नाईकांनी नुसत्या घोषणा,पोकळ आश्वासन थांबवावीत.स्वत:च्या मतदारसंघात कुडाळ येथील महिलाबाल रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये चाललेल्या अनागोंदी कारभाराकडे लक्ष द्यावा.४ कोटी खर्च करून ३५० बेड क्षमतेचे कोविड सेंटर उभे करणार अश्या फुशारक्या मारणारे प्रत्यक्षात ७० बेडचे कोविड सेंटर सुरू करू शकले.तिथे तरी आरोग्य सुविधा,कर्मचारी आहेत का?ते त्यांनी पहावे खोचक असा सल्ला मनसेच्यावतीने अमित इब्रामपूरकर यांनी आमदार वैभव नाईक यांना प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.

प्रसिद्धीपत्रकात पुढे ते म्हणतात आमदारांची कामे मनसेला करावी लागत आहेत.सामाजिक कार्यकर्ते संजय वेंगुर्लेकर यांनी कुडाळ येथील महिलाबाल रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये चाललेल्या अनागोंदी कारभाराबाबत नुकतीच सोशल मिडियावर एक पोस्ट व्हायरल केली होती.या पोस्टची दखल मनसे नेते परशुराम उपरकर यांनी घेत जिल्हाधिकार्‍यांचे काल वेधले होते.त्यानुसार आज जिल्हाधिकारी यांनी या कोविड सेंटरला भेट देत वस्तुस्थितीची पाहणी केली.आणि आवश्यक सुचना केल्या.

दोन-तीन दिवस कुडाळ येथील महिला रुग्णालयातील कोविड सेंटरमधील स्टाफ दिवस आपापसात भांडत आहेत.दोन डॉक्टर सेवा सोडून गेले आहेत.रुग्णांना ऑक्सीजन किंवा व्हेंटिलेटर हे रोजंदारीवर काम करणारे कामगार किंवा स्वतः पेशंटच्या नातेवाईकांना लावावे लागत आहेत.अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते संजय वेंगुर्लेकर यांनी सोशल मिडियावर व्हायरल केलेल्या पोस्ट मध्ये आहे.

याच कोविड सेंटरचे ३५० बेड क्षमता असणार म्हणून ४ कोटी निधीची घोषणा केली. गेल्या जून पासून अनेक वेळा पाहणी केलेल्या आमदार-खासदारांना प्रत्यक्षात सत्तर बेडचे कोविड सेंटर सुरू करता आले.मग घोषणा केलेला ४ कोटींचा निधी सत्तर बेड असलेल्या कोविड सेंटरसाठी खर्च केला का? अर्धवट अवस्थेत असलेल्या विलगीकरण कक्षाचे उद्घाटने करत आमदार गावोगाव फिरत आहेत.
प्रत्यक्षात या विलगीकरण कक्षात कोविड रुग्णांसाठी आवश्यक सुविधा नाहीत मालवणातील नगरपालिकेच्या विलगीकरण कक्षातही अशीच स्थिती आहे.रंगरंगोटी करून उदघाटन करण्यात आलेले कोविड सेंटरही अजून सुरू शकले नाहीत.कोविड साठी असलेला राखीव निधीतून टेंडर काढणे,कामे जवळच्या कार्यकर्त्यांना देणे,अनाठायी खर्च करणे,प्रत्यक्षात सुविधा नसताना उद्घाटने,घोषणा,आश्वासने एवढेच काम वैभव नाईक करत असल्याचा टोलाही मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांनी लगावला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × one =