You are currently viewing काश्मीर ते कन्याकुमारी “अतुल्य भारत, रोलर स्केटिंग यात्रा”…!

काश्मीर ते कन्याकुमारी “अतुल्य भारत, रोलर स्केटिंग यात्रा”…!

पटवर्धन चौकात आम्ही कणकवलीकर यांच्या तर्फे यात्रेचे स्वागत…!

कणकवली

महिला सबलीकरण , जागो ग्राहक जागो , झाडे लावा- झाडे जगवा, पर्यावरण रक्षण , युवाशक्ती मार्गदर्शनाचा संदेश घेऊन निघालेली “अतुल्य भारत रोलर स्केटिंग यात्रा” सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोहोचली आहे . पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या “एक भारत, श्रेष्ठ भारत” ची प्रेरणा घेऊन त्यांचाच मतदारसंघ वारणासीचे 20 ध्येयवेडे ह्या काश्मीर ते कन्याकुमारीच्या यात्रेला निघाले आहेत .सुमारे 5000 किलोमीटर स्केटिंग करत जाणाऱ्या यात्रेमध्ये 12 जण यामध्ये 8 महिला आणि 4 पुरुष स्केटिंग करत हे अंतर पार करणार आहेत तर इतर 8 जण सहाय्यक म्हणून प्रवास करत आहेत . वाराणसी मधून श्री विश्वेश्वराचे आशीर्वाद घेऊन निघालेली ही यात्रा 13 राज्ये , 100 शहरे आणि दहा हजार गावांमधून जाणार आहे .

ही यात्रा 27 सप्टेंबरला काश्मीरच्या श्रीनगरमधील लाल चौकातून निघाली आहे आणि 25 डिसेंबरला कन्याकुमारी येथे पोहोचणार आहे . स्केटिंग यात्रेचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आले . फोंडा येथे आदरातिथ्य स्वीकारून अतुल्य भारत यात्रेचे आज कणकवली येथे आगमन झाले . कणकवली येथील मुख्य चौकात यात्रेचे स्वागत “आम्ही कणकवलीकर” यांच्या तर्फे करण्यात आले.

यात्रेतील सहभागीना येथील पारंपरिक घावणे- चटणी , उकडीचे मोदक ,केळी अशी न्याहारी देण्यात आली .यावेळी अनेकांनी त्यांच्याकडून यात्रे संदर्भात माहिती घेतली . यानंतर कणकवली कॉलेज येथे आयोजित स्वागत समारंभात सहभागी विद्यार्थिनीने आपले अनुभव कथन केले तसेच टीम लीडर सोनी यांनी उपस्थितांना यात्रेबाबतचा उद्देश सांगितला . प्रजापिता ब्रह्मकुमारी साधक , कणकवली व्यापारी संघ ,कणकवली तहसीलदार आदी संस्थांनी देखील अतुल्य भारत यात्रेचे स्वागत केले .

वेगवेगळी स्थान वैशिष्ट्य पाहण्यासाठी वेगवेगळे देश फिरणाऱ्या भारतीयांनी प्रथम अनेक वैशिष्ट्ये आणि निसर्ग सौंदर्याने नटलेला आपला भारत देश पाहावा , असे आवाहन अतुल्य भारत यात्रेच्या सहभागिनीं यावेळी सर्वांना केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा