You are currently viewing राज्य निवडणूक आयोगाकडून ग्रामपंचायत फॉर्म ऑफलाइन” भरण्यास परवानगी

राज्य निवडणूक आयोगाकडून ग्रामपंचायत फॉर्म ऑफलाइन” भरण्यास परवानगी

ऑनलाईन प्रक्रियेत गोंधळ झाल्यामुळे निर्णय…

सावंतवाडी

निवडणूक लढविण्याच्या हक्कापासून कोणीही दूर राहू नये यासाठी अखेर निवडणूक आयोगाकडून “ऑफलाइन” अर्ज स्वीकारण्याची परवानगी देण्यात आली आहे. उद्या शुक्रवार दिनांक २ डिसेंबर सायंकाळी पाच वाजेपर्यंत हा अवधी वाढवून देण्यात आला आहे. याबाबतच्या सूचना राज्य निवडणूक आयोगाचे उपसचिव के. कृष्णमूर्ती यांनी दिल्या आहेत. यासाठी अनेक राजकीय पक्षांकडून पाठपुरावा करण्यात आला होता. तर याबाबतचे वृत्त ब्रेकिंग मालवणीमधून प्रसिद्ध करण्यात आले होते.ग्रामपंचायत निवडणुकांचे अर्ज भरण्यासाठी निवडणूक आयोगाने दिलेली वेबसाईट “स्लो” असल्यामुळे उमेदवारांना त्याचा फटका बसत होता. तशी नाराजी अनेकांकडून व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर कोणीही निवडणूक लढविण्याच्या हक्कापासून वंचित राहता कामा नये यासाठी निवडणूक आयोगाने ऑफलाइन अर्ज भरण्यास परवानगी दिली आहे. तसे आदेश निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. तर उद्या सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑफलाईन उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत, असे निवडणूक आयोगाने दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − 11 =