You are currently viewing मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सावंतवाडीत जंगी स्वागत

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सावंतवाडीत जंगी स्वागत

सावंतवाडी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सावंतवाडी शहरात बुधवारी सायंकाळी ७ च्या सुमारास आगमन झाले. यावेळी सावंतवाडीतील गवळीतिठा येथे त्यांचे ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी मनसे नेते नितीन सरदेसाई, प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर, जिल्हाध्यक्ष धीरज परब, ॲड. अनिल कासकर आदी उपस्थित होते.

यानंतर राज ठाकरे यांनी सावंतवाडी मध्यवर्ती कार्यालय येथे भेट देऊन पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी मनसेचे शहराध्यक्ष आशिष सुभेदार, तालुका उपाध्यक्ष प्रकाश साटेलकर, सचिव कौस्तुभ नाईक, उपशहर अध्यक्ष प्रवीण गवस, लॉटरी सेना तालुका अध्यक्ष राजेश मामलेकर, विभाग अध्यक्ष मंदार नाईक, ॲड.राजू कासकर, अनिल केसरकर निलेश मुळीक, तिरोडा शाखाप्रमुख मनोज कांबळी, यांच्यासह असंख्य मनसैनिक, पदाधिकारी उपस्थित होते.
त्यानंतर रात्री उशिरा ते मळगाव मार्गे हॉटेल आराध्य येथे रवाना झाले. गुरुवारी ते सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील सावंतवाडी दोडामार्ग व वेंगुर्ला येथील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती मनसे पदाधिकाऱ्यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा