You are currently viewing कुडाळ भाजपच्यावतीने नगरपंचायत अधिकाऱ्यांना घेराव

कुडाळ भाजपच्यावतीने नगरपंचायत अधिकाऱ्यांना घेराव

शहरातील विविध समस्यांबाबत देण्यात आले निवेदन

कुडाळ

कुडाळ नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांना कुडाळ शहर भारतीय जनता पार्टीच्यावतीने शहरातील विविध समस्यांबाबत घेराव घालून निवेदन देण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष विनायक राणे, महिला जिल्हाध्यक्ष सौ संध्या तेरसे, माजी नगराध्यक्ष ओंकार तेली, शहराध्यक्ष राकेश कांदे, भाजपा नेत्या दीप्ती पडते, बंड्या सावंत, नगरसेवक सुनील बांदेकर, माजी नगरसेविका अश्विनी गावडे, महिला शहराध्यक्ष ममता धुरी, शक्ती केंद्रप्रमुख राकेश नेमळेकर, निलेश परब, राजू बक्षी, राजेश पडते, युवा मोर्चा अध्यक्ष वरू राणे, राजवीर पाटील, आदिती सावंत, मुक्ती परब, रेवती राणे आदी भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

निवेदनात म्हटले की, शहरातील सेल्फी पॉईंट स्वच्छता, भैरववाडी येथील गतिरोधक, कुडाळ शहरातील बंद अवस्थेत असणारे स्ट्रीट लाईट बाबत होणारे दुर्लक्ष, शहरातील स्वच्छता तसेच गांधी चौक सुशोभिकरण काम व इतर प्रलंबित असणारी कामे तातडीने सुरु करण्याबाबत जाब विचारण्यात आला. येत्या काही दिवसात सदर प्रश्नांवर तातडीने लक्ष घालून समस्या सोडवाव्यात अन्यथा भाजपातर्फे आंदोलन छेडू असा इशारा भाजपच्यावतीने देण्यात आला. तातडीने सर्व समस्या काही दिवसात सोडविल्या जातील असे आश्‍वासन नगरपंचायत अधिकाऱ्यांकडून देण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × five =