You are currently viewing दहिहंडी उत्सवात गोविंदा प्रथमेश परब यांच्या कुटुंबीयांना मुंबई भाजपाच्या गोविंदा विमा संरक्षण माध्यमातून दहा लाखांची मदत……

दहिहंडी उत्सवात गोविंदा प्रथमेश परब यांच्या कुटुंबीयांना मुंबई भाजपाच्या गोविंदा विमा संरक्षण माध्यमातून दहा लाखांची मदत……

दहिहंडी उत्सवात गोविंदा प्रथमेश परब यांच्या कुटुंबीयांना मुंबई भाजपाच्या गोविंदा विमा संरक्षण माध्यमातून दहा लाखांची मदत……

भांडुप वार्ताहर

दहीहंडी उत्सवात भांडुपच्या नरदास नगर येथील प्रगती शाळेच्या पटांगणावर 16 ऑगस्ट 2022 रोजी सायंकाळी सराव करताना थरावरून पडून प्रथमेश परबच्या मानेला गंभीर इजा झाली होती. त्यानंतर प्रथमेशला तातडीने उपचारार्थ मुलुंडच्या अग्रवाल रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर सायन रुग्णालयात पाठवले.
सायन रुग्णालयात उपचारादरम्यान 10 सप्टेंबर 2022 रोजी प्रथमेशने अखेरचा श्वास घेतला होता.
यावेळी भाजपा मुंबईच्या गोविंदा विमा संरक्षणाच्या माध्यमातून आज ईशान्य मुंबईचे . खासदार मनोज कोटक यांनी भांडुप येथे कै. प्रथमेश परब यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांना भाजपच्या विमा संरक्षणाच्या माध्यमातून 10 लाख रुपयांचे मंजुरी पत्र सुपूर्द केले.
यावेळी कोकण विकास आघाडी मुंबई अध्यक्ष सुहास आडिवरेकर , अरुण सावंत, प्रविण दहितुले, जयप्रकाश सिंह, आनंद दिक्षीत,महेश चेंदवणकर, संजय परब,चेतन रिंगे गणेश जाधव, सुभाष सावंत, रोहित सुर्वे, अंकुश माने उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा

8 − 2 =