सरपंच पदासाठी १० तर सदस्य पदासाठी २२ जणांचे नामनिर्देशन पत्र दाखल ; ग्रा. प. निवडणूक अधिकारी आर. जे. पवार यांची माहिती*
कणकवली
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी कणकवली तालुक्यात आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी २ तर दुसऱ्या दिवशी ग्रामपंचायत सदस्य पदासाठी २० जणांचे थेट सरपंच पदासाठी १० जणांचे नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याची माहिती निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार आर. जे. पवार यांनी दिली.
२ डिसेंबर पर्यंत दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार असून, सकाळी ११ ते दुपारी ३ असा वेळ देण्यात आला आहे. कणकवली तहसीलदार दुपारपासूनच नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी इच्छुकांनी गर्दी केली होती.
दिवसभरात डामरे,सरपंच पदासाठी १ अर्ज, हरकुळ बुद्रुक प्रभाग १,सरपंच पदासाठी १,खारेपाटण प्रभाग १ मधून १ अर्ज,सरपंच पदासाठी १ अर्ज,कोळोशी प्रभाग १ मधून १ अर्ज,सरपंच पदासाठी १ अर्ज, कोंडये प्रभाग १ मधून १ अर्ज,सरपंच पदासाठी १ अर्ज,माईन प्रभाग ३ मधून १ अर्ज,नांदगाव प्रभाग सरपंच पदासाठी १ अर्ज, नाटळ प्रभाग १ मधून १ अर्ज,सांगवे प्रभाग २ मधून २ अर्ज,सरपंच पदासाठी १ अर्ज,शिवडाव प्रभाग १ मधून २ अर्ज,फोंडाघाट प्रभाग ३ मधून ३ अर्ज असे मिळून दिवसभरात मंगळवारी सदस्य २० आणि सरपंच पदासाठी १० उमेदवारांनी नामनिर्देश सादर केलं आहे.
शेवटच्या ३ दिवस नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे. निवडणूक विभागाच्या वतीने आलेल्या उमेदवारांचे अर्ज घेण्यासाठी अद्यावत यंत्रणा उभी केली आहे. ५८ ग्रामपंचायत मधून आलेल्या उमेदवारांना वेगवेगळ्या गावांची टेबल व संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी त्या त्या ठिकाणी काम करत आहेत.