You are currently viewing उद्या ३० नोव्हेंबर रोजी भाजपच्या सावंतवाडी तालुका मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन

उद्या ३० नोव्हेंबर रोजी भाजपच्या सावंतवाडी तालुका मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन

सावंतवाडी:

 

महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टीच्या सावंतवाडी तालुका मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन बुधवार दिनांक ३० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता होत असून यावेळी भाजपचे प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे, कणकवली मतदार संघाचे आमदार नितेश राणे, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा बँक संचालक महेश सारंग, जिल्हा प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष संजू परब, जिल्हा चिटणीस मनोज नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

तरी यावेळी भारतीय जनता पार्टीचे सर्व जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी व सदस्य, तालुका कार्यकारणी पदाधिकारी व सदस्य, शहर मंडल कार्यकारीणी पदाधिकारी व सदस्य, सर्व सेलचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी, शक्ती केंद्रप्रमुख, बुथ अध्यक्ष तसेच अन्य लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन भाजपचे बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, आंबोली मंडल अध्यक्ष रवींद्र मडगावकर व सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा